Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर

US Iran Israel War News : इस्रायलने इराणच्या तेहरानमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केल्यामुळे भीषण आग लागली असून आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल-इराण संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर
US Iran Israel War NewsSaam Tv
Published On
Summary
  • इस्रायलने तेहरानमधील इराणच्या तेल रिफायनरीवर मोठा हल्ला केला

  • हल्ल्यानंतर प्रकल्पाला भीषण आग लागून धुराचे लोट पसरले

  • इराणने हैफा येथील रिफायनरीवर हल्ला करून पलटवार केल्याचा दावा

  • युद्धामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवरही परिणाम होण्याची शक्यता

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये आठवडाभर महायुद्ध सुरु आहे. दोन्हीकडून एकमेकांवर दमदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल म्हणजेच ७ मार्च शनिवारी दुपारी सांगितले की आजची रात्र इराणसाठी सर्वात वाईट रात्र असेल.या विधानानंतर काही तासांतच इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यात इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला भीषण आग लागली, या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, आगीचा भडका उडून आकाशात धुराचे काळे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. तेहरानवरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने शनिवारी रात्री सांगितले की, त्यांनी तेहरान येथील सुविधेवरील हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलमधील हैफा येथील एका रिफायनरीवर हल्ला केला आहे.

या हल्ल्याची झळ भारताला देखील लागली आहे. युद्धामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतात पेट्रोल, घरगुती वापरातील सिलेंडर यासारख्या अनेक गोष्टींना युद्धाचा फटका बसला आहे. या युद्धाचा भडका आणखी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com