सोनिया गांधी आणि खरगेंनी 'वंदे मातरम' गीताचा अपमान केला? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं स्पष्टीकरण

Vande Mataram Row: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील वंदे मातरम् गायनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे. सोनिया गांधींवर भाजपने केलेल्या आरोपावर काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं, ते जाणून घ्या.
Sonia Gandhi–Kharge Face BJP Heat Over Vande Mataram; Congress Issues Clarification
Sonia Gandhi–Kharge Face BJP Heat Over Vande Mataram; Congress Issues Clarificationsaam tv
Published On
Summary
  • वंदे मातरम् गायनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वाद

  • सोनिया गांधींवर वंदे मातरम् गायनाला आक्षेप घेतल्याचा आरोप

  • स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम् मुद्द्यावरून दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावरून भाजप आणि काँग्रेसमध्य घमासान वाद सुरू झालाय. स्वातंत्र्यदिनी काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहन कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिसत आहेत. सोनिया गांधी मल्लिकार्जून खरगे यांच्याशी बोलत आहेत. त्यावरून भाजपनं काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय. सोनिया गांधींनी वंदे मातरम गीताचा अपमान केल्याचा आरोप केलाय. दरम्यान भाजपच्या आरोपावर काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलंय.

भाजपाचा आरोप काय?

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय गीताचे गायन मध्यभागी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे आरोप काँग्रेसने खोडून काढलेत. गुजरात भाजप युनिटने एक्सवर पोस्ट करत काँग्रेसवर राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याचा आरोप केलाय. “व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा वंदे मातरमचा अपमान केलाय.

Sonia Gandhi–Kharge Face BJP Heat Over Vande Mataram; Congress Issues Clarification
चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रमोशन; भाजपनं राष्ट्रीय पातळीवर दिली मोठी जबाबदारी

दरम्यान भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “व्होट बँकेच्या लांगूलचालनासाठी; सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरमचे पूर्ण गायन थांबवण्याचा प्रयत्न केला. वंदे मातरमचा द्वेष असल्यामुळेच काँग्रेस लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले नसल्याचं आरोप भाजपकडून करण्यात आलाय.

गुजरात भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत, त्यांनी राष्ट्रगीताचा (राष्ट्रीय गीताचा) अपमान केल्याचा आरोप केला. 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये पक्षाने म्हटले की, "काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अपमान केला असून आपली मानसिकता उघड केली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “दशकांपासून, गांधी आणि काँग्रेसचे सांस्कृतिकदृष्ट्या आत्मविश्वासू, सभ्यतावादी मुळे असलेल्या भारताच्या कल्पनेशी अस्वस्थ संबंध राहिले आहेत.

Sonia Gandhi–Kharge Face BJP Heat Over Vande Mataram; Congress Issues Clarification
Nashik Crime: आमदार पुत्राची शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

गोपाल कृष्ण अग्रवाल म्हणाले,'वंदे मातरम' वाजवले जात असताना सोनिया गांधींनी त्यावर आक्षेप घेतला आणि ते का वाजवले जात आहे, अशी विचारणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडे केली, असा आरोप करण्यात आला. त्यांनी म्हटले की, "'वंदे मातरम' हे केवळ एक गाणे नसून भारताचा स्वातंत्र्यलढा, राष्ट्रीय जाणीव आणि देशभक्ती यांचे ऐतिहासिक प्रतीक आहे. त्याबाबतची अशी वृत्ती काँग्रेस पक्षाची 'आणीबाणीच्या काळातील मानसिकता' दर्शवते."

काँग्रेसचं स्पष्टीकरण

दरम्यान भाजपच्या आरोपांवर काँग्रेसनं फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेसकडून वंदे मातरम गीताचा अपमान करण्यात आला नाहीये. गीत गायनाआधी त्यावेळी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यात यावी यासाठी सुचना करत होत्या. कारण मल्लिकार्जुन खरगे वृद्ध झाले असून त्यांना उभे राहण्यास त्रास होत होता. त्याचवेळी राष्ट्रीय गीत सुरू झाले. त्यामुळे सोनिया गांधी यांनी वेद मातरम गीताचा अपमान केला नसल्याचं काँग्रेसनं सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com