भारतीय रेल्वे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत ट्रेन्सची संख्या वाढण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. सध्या ट्रेन्सची संख्या वाढवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. सध्या रेल्वेचे पूर्ण लक्ष वंदे भारत स्लीपर ट्रेन्स लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केल्या असून रात्रीच्या प्रवासासाठी त्या अधिक आरामदायक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने 9 नवीन मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनचे नेटवर्क वाढवण्यासाठी सज्ज असून 9 नवीन मार्गांवर या ट्रेन्स चालवण्यात चर्चा सुरू आहे. यामध्ये देशातील सर्वात व्यस्त रेल्वे कॉरीडोर मानल्या जाणाऱ्या दिल्ली-मुंबई मार्गाचाही समावेश आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
तसेच रेल्वेकडून इतरही अनेक मार्गांवर विचार केला जात आहे. यामध्ये खालील मार्गांचा समावेश आहे.
नवी दिल्ली ते अहमदाबाद
नवी दिल्ली ते हावडा
नवी दिल्ली ते चेन्नई
नवी दिल्ली ते सिकंदराबाद
नवी दिल्ली ते पुणे
मुंबई ते अहमदाबाद
नवी दिल्ली ते श्रीनगर
दरम्यान रेल्वेने अद्याप या मार्गांची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. हे सध्या फक्त प्रस्तावित मार्ग आहेत, या ठिकाणी प्रवाशांची मागणी जास्त असून जे मोठ्या शहरांना जोडतात.
नुकतीच मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या 'फर्स्ट एसी' (First AC) कोचची पहिली झलक समोर आली होती. प्रीमियम इंटीरियर, मॉडर्न केबिन आणि उत्कृष्ट सुविधांनी सज्ज असलेल्या या ट्रेनने रेल्वेप्रेमी आणि नियमित प्रवास करणाऱ्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेल्या या कोचमध्ये स्वच्छ लेआउट, उत्तम लायटिंग, प्रीमियम फिनिशिंग आणि जागेचा कल्पकतेने केलेला वापर दिसून येतो.
याशिवाय, अपग्रेडेड वॉशरुम्स, ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टम, उत्तम सुरक्षा उपाय आणि सीसीटीव्ही (CCTV) सर्व्हिलन्स यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांचा सफर अधिक आरामदायक आणि सुरक्षित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.