Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! माहीम रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला चाकूने भोसकलं; धक्कादायक कारण समोर

Mumbai Mahim Railway Station Knife Attacked : माहीम रेल्वे स्थानक परिसरात धक्का लागल्याबद्दल माफी मागूनही एका प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत ३५ वर्षीय नवीन प्रसन्न गंभीर जखमी.
MAHIM STATION KNIFE ATTACK: COMMUTER STABBED AFTER APOLOGISING FOR ACCIDENTAL PUSH IN MUMBAI
MAHIM STATION KNIFE ATTACK: COMMUTER STABBED AFTER APOLOGISING FOR ACCIDENTAL PUSH IN MUMBAISaam Tv
Published On
Summary
  • माहीम स्टेशन परिसरात किरकोळ धक्काबुक्कीतून वाद

  • किरकोळ वादातून प्रवाशावर चाकूहल्ला

  • जखमी प्रवासी गंभीर जखमी

  • आरोपीवर गुन्हा दाखल

Mumbai Mahim Station Knife Attacked Navin Prasanna मुंबई लोकलमधील हत्या प्रकरण ताजे असतानाच माहीम स्थानक परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धक्का लागला म्हणून सॉरी म्हटल्यानंतरही माहीम स्टेशन परिसरात पाठलाग करत एका व्यक्तीने प्रवाशाला चाकूने भोसकले. या दुर्घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवीन प्रसन्न (वय ३५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहीम पश्चिम येथील पीतांबर लेनमधील कुरेशी महल कंपाऊंडमध्ये राहणारे नवीन प्रसन्न (वय ३५) हे लोअर परळ येथील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. २५ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतत होते. लोअर परळ स्थानकातून धीमी लोकल पकडून ते माहीम स्थानकात उतरले.

MAHIM STATION KNIFE ATTACK: COMMUTER STABBED AFTER APOLOGISING FOR ACCIDENTAL PUSH IN MUMBAI
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

स्थानकाबाहेर चालत असताना त्यांचा चुकून एका अनोळखी व्यक्तीला धक्का लागला. या धक्क्यामुळे त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल खाली पडला. प्रसन्न यांनी तत्काळ संबंधित व्यक्तीची माफी मागितली आणि धक्का चुकून लागल्याचे म्हटले. नंतर मोबाईल उचलून तपासल्यानंतर कोणतेही नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. मात्र, तरीही त्या व्यक्तीने संताप व्यक्त करत नवीन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

MAHIM STATION KNIFE ATTACK: COMMUTER STABBED AFTER APOLOGISING FOR ACCIDENTAL PUSH IN MUMBAI
Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

वाद वाढू नये म्हणून नवीन प्रसन्न तेथून निघून गेले. मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट मार्ग परिसरात आरोपीने नवीन यांच्यावर अचानक चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी नवीन यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र आरोपीने हातातील चाकू दाखवत आजूबाजूच्या नागरिकांना धमकावले. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर नवीन यांच्या भावाने त्यांना तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com