Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Ladki Bahin Yojana June Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या ₹१५०० हप्त्याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा आहे. जूनचा हप्ता नेमका कधी जमा होणार? याची चर्चा सुरू झाली.
Ladki Bahin Yojana June Installment Update
Ladki Bahin Yojana June Installment Update
Published On

Maharashtra Ladki Bahin Yojana June installment latest update : जून महिना संपायला आता अवघे ७ ते ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यभरातील 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता कधी जमा होणार? पण अद्याप पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता जमा झालेला नाही. अथवा त्यावर कोणतीही अपडेट आलेली नाही. जून महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बँक खात्याकडे लागल्या नजरा

१६ जूनपासून राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा झाला. पण आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे, राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष आपल्या बँक खात्याकडे आणि मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लागले आहे. ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सध्या महिलांमध्ये 'हप्ता कधी पडणार?' या एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ladki Bahin Yojana June Installment Update
Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

हप्ता कधी जमा होणार?

राज्य शासनाकडून डीबीटी (DBT - Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वटपौर्णिमेला महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता येऊ शकतो असे काही जण सांगत आहे. २९ जून रोजी वटपौर्णिमा आहे. राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana June Installment Update
Ladki Bahin Yojana : फक्त एका जिल्ह्यात एक लाख २१ हजार लाडक्या बहिणी अपात्र, कारणही आले समोर; पाहा ₹१५०० चा लाभ का झाला बंद?
Ladki Bahin Yojana June Installment Update
Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

हे काम कराच, अन्यथा हप्ता रखडेल

प्रशासकीय वर्तुळातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता रखडणार नसून, महिना अखेरीस म्हणजेच २८ ते ३० जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात ₹१५०० ची रक्कम वर्ग केली जाऊ शकते. ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आणि अ‍ॅक्टिव्ह आहे, त्यांना सर्वात आधी हा लाभ मिळेल. त्यामुळे ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप आपले बँक खाते आधारशी लिंक केले नसेल, त्यांनी तातडीने बँकेत जाऊन 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana June Installment Update
Ladki Bahin Yojana : 80 लाख लाडक्या बहि‍णींचे १५०० कायमचे बंद, ४ महत्त्वाची कारणं आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com