Pune : पुणे हादरलं! विहिरीत उडी मारून महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

Pune Sucide News : पुण्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे कौटुंबिक वादानंतर 26 वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
PUNE SHOCKER: 26-YEAR-OLD MARRIED WOMAN DIES AFTER JUMPING INTO WELL FOLLOWING FAMILY DISPUTE
PUNE SHOCKER: 26-YEAR-OLD MARRIED WOMAN DIES AFTER JUMPING INTO WELL FOLLOWING FAMILY DISPUTESaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

  • कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता

Pune Married Woman Sucide News पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरात कौटुंबिक वादातून एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे . या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच नाव स्वाती विजय कांबळे (वय २६) असे आहे. स्वातीचा कुटुंबियांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली आणि घराजवळच असलेल्या एका विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

PUNE SHOCKER: 26-YEAR-OLD MARRIED WOMAN DIES AFTER JUMPING INTO WELL FOLLOWING FAMILY DISPUTE
Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने महिलेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तात्काळ लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

PUNE SHOCKER: 26-YEAR-OLD MARRIED WOMAN DIES AFTER JUMPING INTO WELL FOLLOWING FAMILY DISPUTE
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर स्पष्ट केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी आता पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com