Alisha Khedekar
चोच हे पक्ष्यांचे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहे. अन्न मिळवणे, खाणे, घरटे बांधणे आणि संरक्षण यासाठी तिचा उपयोग होतो.
पक्षी कोणते अन्न खातात यानुसार त्यांच्या चोचीचा आकार ठरतो.
चिमणीसारख्या पक्ष्यांची छोटी, मजबूत आणि शंकूच्या आकाराची चोच बिया व दाणे सहज टिपण्यासाठी उपयुक्त असते.
फुलांतील मधुरस पिणाऱ्या पक्ष्यांची चोच लांब व बारीक असते. ती नैसर्गिक स्ट्रॉप्रमाणे काम करते.
घार, घुबड आणि गिधाड यांसारख्या पक्ष्यांची चोच वाकडी व धारदार असते, ज्यामुळे मांस फाडणे सोपे होते.
सुतारपक्षीची टोकदार, सरळ चोच लाकूड पोखरून कीटक शोधण्यास मदत करते.
पोपटाची बाकदार व शक्तिशाली चोच कठीण फळांचे आवरण फोडते. ती झाडांवर चढण्यासाठीही उपयोगी ठरते.
चोचीवर केरेटिन नावाच्या प्रथिनाचे आवरण असते. यामुळे चोच मजबूत राहते आणि तिला विविध रंग प्राप्त होतात.
NEXT : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?