Maharastra : सर्वसामान्यांना झटका! कपड्यांची शिलाई महागणार, किती रुपये मोजावे लागणार? वाचा

Tailoring Stitching Rates Increase Update : महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा फटका आता शिलाई व्यवसायालाही बसत आहे. ब्लाऊज शिलाई, फॉल-बिडिंग तसेच इतर शिलाई सेवांच्या दरांत १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
MUMBAI TAILORING RATES MAY RISE BY 10 PERCENT AS RAW MATERIAL COSTS SURGE
MUMBAI TAILORING RATES MAY RISE BY 10 PERCENT AS RAW MATERIAL COSTS SURGESaam Tv
Published On
Summary
  • महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे शिलाई दरांत १० टक्क्यांपर्यंत वाढ

  • अस्तर, धागा, फॉल आणि इतर शिलाई साहित्याच्या किमतीत वाढ

  • ग्राहकांच्या खिशाला खात्री

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींचा परिणाम आता शिलाई व्यवसायावरही दिसून येत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, दुकानांचे वाढलेले खर्च आणि महागाईचा वाढता दबाव यामुळे मुंबई व उपनगरांतील शिलाई दरांमध्ये सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ब्लाऊज, फॉल-बिडिंग तसेच इतर शिलाई कामांसाठी ग्राहकांना यापुढे अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

टेलरिंग व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या अस्तर, धागा, साडीचे फॉल, बटणे, चेन, सुया आणि शिलाई यंत्रांचे सुटे भाग यांसारख्या साहित्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्व उपनगरातील विविध भागांमध्ये अस्तर सध्या ३० ते ३५ रुपये प्रतिमीटर दराने विकले जात आहे. महागाईचा विचार करता या दरात आणखी किमान ४ रुपये प्रतिमीटर वाढ होण्याची शक्यता कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.

MUMBAI TAILORING RATES MAY RISE BY 10 PERCENT AS RAW MATERIAL COSTS SURGE
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

धाग्याच्या किमतीतही वाढ होण्याचे संकेत आहेत. सध्या ७ रुपयांना मिळणारे धाग्याचे रीळ ९ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिलाईचा एकूण खर्च वाढणार असून त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. सध्या बिडिंगसाठी १० ते १५ रुपये आकारले जातात, तर फॉल-बिडिंगचे दर विभागानुसार ६० रुपयांपर्यंत आहेत. मात्र, वाढत्या खर्चामुळे दरात १० ते २० रुपयांची वाढ करावी लागेल, असे कारागिरांचे म्हणणे आहे.

MUMBAI TAILORING RATES MAY RISE BY 10 PERCENT AS RAW MATERIAL COSTS SURGE
Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

दरम्यान, बाजारात १५ रुपयांना मिळणारा साडीचा फॉलही महागण्याची शक्यता असून त्याची किंमत १८ रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ब्लाऊज शिलाईच्या दरांवरही याचा परिणाम होणार आहे. सध्या साध्या ब्लाऊजची शिलाई ३०० रुपयांपासून सुरू होते. मात्र, या दरात काम करणे आता परवडत नसल्याचे टेलरिंग व्यावसायिक सांगतात. त्यामुळे साध्या ब्लाऊजच्या शिलाईसाठी ४०० रुपये किंवा त्याहून अधिक दर आकारले जाऊ शकतात.

MUMBAI TAILORING RATES MAY RISE BY 10 PERCENT AS RAW MATERIAL COSTS SURGE
Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! माहीम रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला चाकूने भोसकलं; धक्कादायक कारण समोर

अंधेरी, गिरगाव, लालबाग, कुर्ला, बोरीवली, मुलुंड आणि घाटकोपर यांसारख्या भागांमध्ये स्थानिक बाजारपेठ, दुकानाचे भाडे, ग्राहकवर्ग आणि कामाच्या गुणवत्तेनुसार शिलाईचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे दरवाढीचा परिणाम प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे शिलाई दरवाढ आता जवळपास अपरिहार्य बनल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com