Shocking : खळबळजनक! माजी मंत्र्यांच्या सूनेची हत्या; बेडरुममध्ये पती आणि बॉयफ्रेंडची दारु पार्टी, अचानक...

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये माजी मंत्र्याच्या सूनेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. बेडरुममध्ये पती आणि बॉयफ्रेंडची दारू पार्टी सुरु होती. त्याच बेडरुममध्ये सूनेचा मृतदेह आढळला.
uttar pradesh Latest News
uttar pradesh News Saam tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडवून देणारं हत्याकांड घडलंय. उत्तर प्रदेशमध्ये माजी मंत्र्यांच्या ३६ वर्षीय सूनेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दारू पार्टीनंतर एका खोलीत सूनेचा मृतदेह आढळला. मृत सूनेच्या चेहरा, गळा आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत. माजी मंत्र्यांच्या ३६ वर्षीय सूनेच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्वत: महिला, महिलेचा पती आणि बॉयफ्रेंडची बेडरुममध्ये दारू पार्टी सुरु होती. पार्टीदरम्यान वाद झाला. या वादात सूनेची हत्या झाली. भाडेकरूंना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बेडरुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी बेडरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या बाजूला तिचा बॉयफ्रेंड झोपलेला होता. तर महिलेचा पती सोफ्यावर होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. मृत महिलेच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत.

uttar pradesh Latest News
Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या

माजी मंत्री रतनलाल अहिरवार यांचा भाऊ तुलसीदास यांचा मुलगा रविंद्र अहिरवार हे त्यांची पत्नी आणि ३ मुलांसोबत कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. मृत महिलेच्या मोठ्या मुलीने सांगितलं की, 'रोहित वाल्मिकी हा गुरुवारी रात्री ९ वाजता दारू घेऊन आला होता. आई संगीता, रोहित आणि वडिलांची घरात दारू पार्टी सुरु होती. त्यांनी बेडरुमचा दरावाजा आतून बंद केला होता. तिन्ही मुलांना भाडेकरू महिलेच्या घरी पाठवलं. तिघांची खूप वेळ दारू पार्टी सुरु होती.

uttar pradesh Latest News
Nagpur Faheem Khan VIDEO : हिंसाचाराआधी पोलिसांशी हुज्जत; मास्टरमाईंड फहीम खानचा आणखी एक व्हिडिओ समोर

मुलीने पुढे सांगितलं की, 'आम्ही एका तासानंतर खाली आलो. त्यानंतर दुसऱ्या खोलीत गोले. त्यावेळी बेडरूममधून हाणामारीचा आवाज येत होता. आई ओरडत होती. मी धावत बेडरुम जवळ जाऊन दरवाजा ठोठावला. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर रोहित वाल्मिकीने खाऊ घ्यायला १०० रुपये दिले. त्यानंतर रोहितने पुन्हा दरवाजा बंद केला. मी धावत धावत पुन्हा भाडेकरू शंकुतला यांच्याजवळ गेली.

uttar pradesh Latest News
illegal schools list : पालकांनो सावधान! कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; संपूर्ण यादीच आली समोर

शंकुतला यांनी बेडरुमचा दरवाजा ठोठवला. मात्र, त्यांनी दरवाजा उघडला नाही. शंकुतला यांनी ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी बेडरुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी बॉयफ्रेंड महिलेच्या बाजूला होता. पती सोफ्यावर होता. पोलिसांनी दोघांना तातडीने ताब्यात घेतलं. खोलीत दारुच्या बाटल्या होत्या. संगीताला १२ वर्षीय एंजल, १० वर्षीय अर्पिता, ५ वर्षीय मुलगा अंश अशी तीन मुले आहेत. महिलेचा मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com