Nagpur Faheem Khan VIDEO : हिंसाचाराआधी पोलिसांशी हुज्जत; मास्टरमाईंड फहीम खानचा आणखी एक व्हिडिओ समोर

Nagpur Faheem Khan another VIDEO : नागपुरातील हिंसाचाराआधी फहीमने पोलिसांशी हुज्जत घातली.नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंड फहीम खानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
nagpur News
nagpur Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद थेट जाळपोळीपर्यंत पोहोचला. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी काहींना ताब्यात घेण्यात आलं आहे. हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. फहीम खानवर जमावाला चिथावल्याचा आरोप करण्यात येत आहे. मास्टरमाईंड फहीम खानचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.

nagpur News
Nagpur : नागपूरच्या हिंसाचाराला फहीम खान जबाबदार, पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय काय? | VIDEO

नागपुरात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर दुसऱ्या गटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विरोधात निदर्शने सुरु केली. त्यानंतर दोन्ही गटाचा वाद उफाळून हिंसाचार झाला. दोन गटात हिंसाचार झाल्यानंतर दगडफेक झाली. या दगडफेकीत काही नागरिकांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले. एका गटाने रस्त्यावरील वाहने जाळली. नागपुरात एका गटाला चिथावल्याचा आरोप फहीमवर करण्यात येत आहे.

nagpur News
Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर हटवता येऊ शकते का? कायदेतज्ज्ञांनीनी सगळंच सांगितलं

नागपुरातील याच फहीमचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष हा फहीम खान हा पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांच्याशी हुज्जत करताना दिसून येत आहे. पोलिसांनी त्याला नीट समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो पोलिसांशी हूज्जत घालत होता.

नागपुरात झालेल्या हिंसेकरिता फहीम खान हाच मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. सर्व व्हिडिओ , फोटो आणि व्हिडिओतील संभाषण पाहता चिथावणी देण्याचे काम फहिम खान यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

nagpur News
Devendra Fadnavis : विद्यार्थ्यांना दिलासा! भविष्यात MPSCची मोठी भरती; CM देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण प्लान सांगितला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com