Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर हटवता येऊ शकते का? कायदेतज्ज्ञांनीनी सगळंच सांगितलं

Aurangzeb Tomb latest News : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कबर हटवण्यावर कायदेतज्ज्ञांनीनी सगळंच सांगितलं.
Aurangzeb Tomb news
Aurangzeb Tomb :Saam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबरीवरून राजकारण तापलं आहे. राज्यात एका गटाकडून औरंगाजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदू संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. याच औरंगजेबाच्या कबरीचा वाद नागपुरात जाळपोळीपर्यंतही पोहोचला. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवता येऊ शकते का, यावर कायद्याच्या अभ्यासकांनी भाष्य केलं आहे.

Aurangzeb Tomb news
Shirdi Crime : शिर्डीत खळबळ! मैत्रीत वादाची ठिणगी, किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने सपासप

कायद्याचे अभ्यासक, वकील गोविंद शर्मा यांनी म्हटलं की, 'केंद्र सरकारने संरक्षित स्मारकाच्या यादीतून जर औरंगजेबाची कबर डी लिस्ट केली म्हणजे त्या यादीतून काढली तर कबरीला असलेले कायदेशीर संरक्षण निघून जाईल. त्यानंतर औरंगजेबाची कबर हटवता येऊ शकते'.

Aurangzeb Tomb news
Success story : दोन वेळ खाण्याची भ्रांत, वडिलांना महिना १२ हजार पगार; लेकीला मिळाली ४५ लाखांच्या नोकरीची ऑफर

कबरीला कुणाचं संरक्षण ?

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं आहे. खुलताबाद इथे असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी सुरू आहे. मात्र, त्या कबरीला केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाचे संरक्षण आहे. मग कबर खरंच काढून टाकता येते का, याविषयी जाणून घेऊयात.

प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५१, नुसार, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण मिळाले. त्यानंतर १९५८ साली ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1958 हा कायदा आला. त्यामध्ये १९५१ च्या कायद्यानुसार मान्यता मिळालेले सर्व हिस्टॉरिकल मोनुमेंट्स समाविष्ट करण्यात आले.याच कायद्याच्या कलम ३५ नुसार केंद्र सरकार नोटिफाय करून कोणतेहीहिस्टॉरिकल मोनुमेंट्स यादीतून वगळू शकते.

Aurangzeb Tomb news
Pune Crime : धक्कादायक! घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये भरायचे गॅस; पोलिसांनी रॅकेटचा असा केला पर्दाफाश

२०२४ मधे केंद्र १८ मोनुमेंट्स लिस्ट मधून वगळले होते. त्यामुळे केंद्राला जर वाटले तर ते ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1958 कायद्यातील कलम ३५ चा वापर करून औरंगजेबाच्या कबरीला मिळालेल्या कायदेशीर संरक्षणाला काढू शकते. त्यानंतर राज्य सरकारला ती कबर उखडून टाकता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com