Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या

Jalgaon Ex Deputy Sarpanch Killed Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण ताजे असतानाच जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातील तिघांनी त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
Jalgaon Ex Deputy Sarpanch Killed Case:Saam Tv
Published On

जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जळगावजवळील कानसवाडा गावामध्ये ही घटना घडली. माजी उपसरपंचाची दिवसाढवळ्या चॉपर आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. युवराज सोपान कोळी असं हत्या झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. याप्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावातीलच ३ जणांनी त्यांची हत्या केली.

Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
Jalgaon Crisis: ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदतीसाठी तिघेच ठरले पात्र; जळगावातील भयावह परिस्थिती

कानसवाडा गावातीलच तिघांनी आज सकाळी ८ च्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवराज कोळी यांचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
Jalgaon : मुलाचा वाढदिवस साजरा करून परतताना पित्याचा मृत्यू; रेल्वेत चढताना गेला तोल

रुग्णालयाबाहेर युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. युवराज कोळी यांची हत्या का केली? यामागचे नेमके कारण समोर आले नाही. युवराज कोळी यांच्या हत्येनंतर तिन्ही मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

Jalgaon Crime: जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या
Jalgaon Accident : गाढ झोपेतच काळाचा घाला; भरधाव वाहनाने मजुरांना चिरडले, तिघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com