Jalgaon Accident : गाढ झोपेतच काळाचा घाला; भरधाव वाहनाने मजुरांना चिरडले, तिघांचा मृत्यू

Jalgaon News : पाळधी ते तरसोद असा राष्ट्रीय महामार्ग गेला असून आता नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv
Published On

जळगाव : जळगाव- भुसावळ दरम्यान झालेल्या फोर वे महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. यात रेल्वे उड्डाणपुला लगत काम सुरू असून याठिकाणी परप्रांतीय व काही स्थानिक मजूर काम करतात. दरम्यान परप्रांतीय मजूर काम आटोपल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच रात्र काढत असतात. त्यानुसार रात्री साईड पट्टीवर झोपले असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या अंगावरुन गेले. यात तिघा मजुरांचा गाढ झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जळगाव खुर्द या गावालगतच अपघात रात्रीच्या सुमारास घडला आहे. पाळधी ते तरसोद असा राष्ट्रीय महामार्ग गेला असून आता नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रोडच्या आणि पुलाच्या कामाच्या ठिकाणी परप्रांतीयांसह काही स्थानिक मजूर देखील कामाला आहेत. 

Jalgaon Accident
Badlapur : सरकारी पुलाला तारेचं कुंपण; शासनाच्या पैशातून खासगी जागा मालकीसाठी बांधला पूल?

बंदी असताना वाहनाचा प्रवेश 

दरम्यान ११ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील सिकंदर नाटूसिंग राजपूत, भूपिंदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर हे सर्व्हिस रोडवरचे दिवसभराचे काम आटोपल्यानंतर रात्री बांधकामाचे साहित्य व पट्टी टाकून झोपले होते. हे तिघेजण गाढ झोपेत असताना अज्ञात वाहन या रस्त्यावरून येत तिघांना चिरडून निघून गेले. दरम्यान वाहतुकीस बंदी असताना देखील येथून कोणते वाहन गेले याचा अद्याप तपास लागलेला नाही. 

Jalgaon Accident
Nanded Civil Hospital : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; लहान मुलांच्या आयसीयू वार्डात झुरळ, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

रोजीरोटीसाठी घर सोडले 
मृत तरुणांच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार ते लावत होते. अर्थात दिवसभर रोजंदारीवर काम करायचे, मिळेल ते खायचे, असे निर्वासिताचे आयुष्य हे मजूर मंडळी जगते. रोजीरोटीसाठी हे मजूर उत्तर प्रदेशातून जळगावमध्ये मजुरीचे काम करत होते. दरम्यान पोलिसांनी तिघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून कुटुंबीयांना जळगावी पोहोचण्यासाठी दोन दिवसांचा रेल्वे प्रवास करून यावे लागणार असल्याने मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात शीतगृहात ठेवण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com