Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने बायकोची हत्या केली. या तरुणाने बायकोला बेडरुममध्ये तीन तरुणांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होते. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात तरुणाने तिची हत्या केली.
Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य
Uttar Pradesh Crime newsSaam Tv News
Published On

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • तरुणाने मध्यरात्री बेडरुममध्ये तीन तरुणांसोबत बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडल

  • संतापलेल्या नवऱ्याने बायकोची गळा आवळून हत्या केली

  • आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरुणाने बायकोची गळा दाबून हत्या केली. ४ महिन्यांपूर्वी दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. बायकोला बेडरुममध्ये तीन तरुणांसोबत नको त्या अवस्थेत तरुणाने पाहिले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने बायकोची हत्या केली. त्यानंतर तरुण स्वत: पोलिस ठाण्यात पोहचला आणि त्याने बायकोची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सिंग असे आरोपीचे नाव असून तो मूळचा फतेहपूर जिल्ह्यातील महानपूर गावचा रहिवासी आहे. शनिवारी तो रडत रडत पोलिस स्टेशनमध्ये आला आणि त्याने पोलिसांना सांगितले की, 'साहेब, मी माझ्या बायकोची गळा दाबून हत्या केली. तिचा मृतदेह घरी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला आहे.' यामुळे पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर सचिनने पोलिसांना जे काही सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावले.

Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य
Shocking: बायकोचं अनैतिक संबंध, पाठलाग करत नवरा हॉटेलवर पोहचला, बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं

सचिनचे गावातील श्वेता नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन कोर्टात लग्न केले होते. कुटुंबाच्या नाराजीमुळे ते दोघे सुरतला राहायला गेले. तिथे सचिन एका कंपनीत कामाला लागला. पण एका महिन्यानंतर ते कानपूरला परतले आणि महाराजपूर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहायला लागले. सचिनने तिथे ऑटोरिक्षा चालवायला सुरुवात केली. १३ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यासाठी गेला. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तो घरी आला. पण घरामध्ये त्याने जे चित्र पाहिले ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य
Shocking: ३ लग्न, १३४ मुलं अन् नातवंडं, ११० व्या वर्षी झाले होते बाबा; आता १४२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

घरी आल्यानंतर सचिनने पाहिले की त्याची बायको बेडवर तीन तरुणांसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. हे तिन्ही तरुण नजीकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते आणि ते सचिनच्या घरासमोरच राहत होते. संतापलेल्या सचिनने व्हिडीओ बनवायला घेतला तर त्याच्या बायकोने आणि तरुणांनी मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला मारहाण केली. आवाज ऐकून शेजारच्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिसांनी सचिन, त्याची बायको आणि या तिन्ही तरुणांना पोलिस ठाण्यात नेले.

Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य
Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित

त्याठिकाणी पोलिसांनी सचिन आणि त्याच्या बायकोची समजूत काढून त्यांना घरी पाठवले तर तिन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. घरी आल्यानंतर सचिनच्या बायकोने त्याच्याशी भांडण केले. तिन्ही तरुणांना मी सकाळपर्यंत सोडवून आणेल पण तुला सोडणार नाही. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादात मध्यरात्री ३ वाजता सचिनने बायकोची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सचिनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य
Actress Shocking Statement: मला फक्त बेडवर पुरुष हवा, आयुष्यात नाही...; 54 वर्षीय 'या' सिंगल अभिनेत्रीने केलं धक्कादायक विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com