Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित

DGP Ramchandra Rao: कर्नाटकातील डीजीपी के. रामचंद्र राव यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑफिसमध्ये महिलांसोबत अश्लिल कृत्य करतानाचे हे व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित केले.
Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित
DGP Ramchandra RaoSaam TV
Published On

Summary:

  • कर्नाटकातील डीजीपींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत

  • ऑफिसमध्येच त्यांनी महिलांसोबत अश्लिल कृत्य केले

  • महिलांना मिठी मारताना आणि किस करतानाचे त्यांचे व्हिडीओ चर्चेत

  • हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले

कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमुळे कर्नाटकातील पोलिस दल आणि राजकारणात खळबळ उडाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई केली. के. रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्र राव १० दिवसांच्या सुट्टीवर निघून गेले.

Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित
धक्कादायक! IPS अधिकारी अन् तरुणी ऑफिसमध्ये नको त्या अवस्थेत; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं, VIDEO व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये रामचंद्र राव हे त्यांच्या ऑफिसमध्ये महिलांसोबत अश्लिल कृत्य करताना दिसले. त्यांचे एक नाही तर दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ते या व्हिडीओमध्ये महिलांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्र राव हे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्यासाठी गेले होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही.

Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित
Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

गृहमंत्र्यांच्या घराबाहेर माध्यमांशी बोलताना रामचंद्र राव यांनी सांगितले होते की, 'हे व्हिडीओ खोटे आहेत. मला फसवले जात आहे. हे व्हिडीओ पाहून मलाच धक्का बसला. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलांशी माझा काहीही संबंध नाही. आजकाल कुणालाही फेक व्हिडीओ तयार करता येता. हे व्हिडीओ तयार करून माझी प्रतिमा खराब करण्याचे हे षडयंत्र असू शकते.'

Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित
Shocking: ३ लग्न, १३४ मुलं अन् नातवंडं, ११० व्या वर्षी झाले होते बाबा; आता १४२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

रामचंद्र राव वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील आहेत. मार्च २०२५ मध्ये सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. रान्या वर तिच्या वडिलांच्या पदाचा फायदा घेऊन प्रोटोकॉलचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दरम्यान, व्हायरल झालेले व्हिडीओ आताचे नाही तर ते एक वर्ष जुने असल्याचे म्हटले जात आहे. सोनं तस्करी प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला अटक होण्यापूर्वीचे हे व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. पण याबाबत अद्याप पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही.

Shocking: ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य, आधी मिठी मारली मग किस केला; VIDEO व्हायरल होताच DGP निलंबित
Shocking: बायकोचं अनैतिक संबंध, पाठलाग करत नवरा हॉटेलवर पोहचला, बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com