धक्कादायक! IPS अधिकारी अन् तरुणी ऑफिसमध्ये नको त्या अवस्थेत; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं, VIDEO व्हायरल

karnataka ips officer video viral : IPS अधिकारी आणि महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्याने व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले आहे.
ips officer video viral
karnataka ips officer video viral Saam tv
Published On
Summary

पोलीस अधिकाऱ्याचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटक पोलीस दलात खळबळ

व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचा अधिकाऱ्याचा दावा

बेंगळुरूच्या आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसाची वर्दी अंगात असलेले अधिकारी हे कार्यालयातच महिलेसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे व्हिडिओतून समोर आलं आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी संबंधित विभागाला स्पष्टीकरणाचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी एकच संताप व्यक्त केला. परंतु या अधिकाऱ्याने आरोप फेटाळून लावले आहेत. डीजीपी रामचंद्र राव यांनी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्हिडिओ मॉर्फ/बनावट असल्याचा दावा केला आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे', असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे शासन या व्हिडिओची पडताळणी करत आहेत.

ips officer video viral
सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस विभागातील चुकीच्या घटना चव्हाट्यावर आल्याने नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महिला वेगवेगळ्या दिवशी अधिकाऱ्याच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्या अंगातील कपडे वेगळे दिसत आहेत'.

तत्पूर्वी, पोलीस स्टेशनमध्ये अद्याप कोणत्याही महिलेने या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. परंतु या व्हिडिओमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणारवरून मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे. या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

ips officer video viral
महापौरपदावरून मोठा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार

डीजीपी रामचंद्र राव यांनी स्पष्ट केलं आहे की, 'मला बदनाम करण्यासाठी खोडसाळपणे व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. व्हायरल होणार व्हिडिओ खोटा आणि बनावट आहे. काही लोकांनी मला त्रास देण्याच्या हेतून व्हिडिओ तयार केला आहे. प्रशासन या व्हिडिओची पडताळणी करत आहेत'. परंतु वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com