Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, ३ खेळाडूंचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर आज पहाटे भीषण अपघात झाला. कारने ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये ३ खेळाडूंचा मृत्यू झाला.
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, ३ खेळाडूंचा जागीच मृत्यू
Uttar Pradesh AccidentSaam Tv
Published On: 
  • उत्तर प्रदेशमध्ये अपघातात तीन टेनिसपटूंचा मृत्यू

  • पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक

  • पहाटे ५ वाजताच्या सुमारास भरधाव कारने ट्रकला पाठिमागून धडक दिली

  • कारमधून ६ जण प्रवास करत होते

उत्तरप्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ३ खेळाडूंचा मृत्यू झाला. सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर बुधवारी पहाटे हा अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारे ६ टेनिसपटू गंभीर जखमी झाले. यामधील तिघांचा जास्त रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर ३ गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून ६ जण प्रवास करत होते. ते लखनऊवरून देवरिया येथे जात होते. बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात झाला त्यावेळी कारचा वेग १०० किमी प्रतितास होता.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, ३ खेळाडूंचा जागीच मृत्यू
Accident: अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारमध्ये दोन जण अडकले होते. बचावकार्य करत पोलिसांनी ३ जखमींना शैय्या संयुक्त चिकित्सालयमध्ये उपचारासाठी दाखल केले.पण तिघांचीही प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या ३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, ३ खेळाडूंचा जागीच मृत्यू
Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

या अपघातामध्ये नित्या प्रजापती (२२ वर्षे), इरफान अंसारी (२० वर्षे) आणि अनिकेत (२४ वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला. तर आनंद यादव (२३ वर्षे), राजू यादव (२२ वर्षे) आणि जयंतो शर्मा (३० वर्षे) हे तिघे जण जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, ३ खेळाडूंचा जागीच मृत्यू
Accident News : मध्यरात्री नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com