Accident: अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण कार अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ट्रेलरला धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.
Accident: अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Gujarat AccidentSaam Tv
Published On: 
  • गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात

  • भावनगरमध्ये कार आणि ट्रेलरचा अपघात

  • या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू

  • भावनगर-सोमनाथ महामार्गावरील अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भावनगर जिल्ह्यातील भावनगर-सोमनाथ नॅशनल हायवेवर हा अपघात झाला. सर्व्हिस रोडवर उभ्या राहिलेल्या ट्रेलरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील ७ जणांनी जागीच प्राण सोडले. या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गुजरातमधील भावनगर-सोमनाथ नॅशनल हायवेवर शिवशक्ती हॉटेलजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. या कारमधून अलंग शिप ब्रेकिंग यार्डचे सात कर्मचारी प्रवास करत होते. ते कामासाठी भावनगरहून अलंग शिपयार्डकडे जात होते. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला.

कारने ट्रेलरला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये अवजड ट्रेलरची पुढची चाकेही तुटून पडली. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजयभाई चंदूभाई व्होरा, पियुषभाई बिपिनचंद्र शाह, प्रितेशभाई बिपिनचंद्र भयानी, भार्गवभाई गोसाई, हिरेनभाई मेहता आणि योगेशभाई शाह आणि जयेशभाई हिम्मतभाई वसानी अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की भरधाव वेगाने येणारी पांढऱ्या रंगाची कार रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला जाऊन धडकते. कार ट्रेलरच्या मागच्या बाजूला घुसते. तर कारच्या धडकेमुळे ट्रेलरमधील चालक रस्तयावर खाली पडतो. धडकेमुळे कारच्या पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला धडक, सात जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Accident News : भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू, भरधाव डंपरची कारला जोरदार धडक; वाहनांचा चक्काचूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com