Accident News : भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू, भरधाव डंपरची कारला जोरदार धडक; वाहनांचा चक्काचूर

Uttar Pradesh Car Accident News : मुजफ्फरनगरच्या लक्सर रोडवर भरधाव डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत.
Muzaffarnagar Dumper Car Accident:
Muzaffarnagar Dumper Car Accident:AI Image
Published On: 
Summary
  • मुजफ्फरनगरच्या लक्सर रोडवर भरधाव डंपर आणि कारची भीषण धडक

  • या अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी

  • पोलिसांनी डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले

  • अपघाताचा पुढील तपास सुरु आहे

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्सर रोडवर भरधाव डंपरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला असून, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लक्सरच्या दिशेने एक कार जात होती. याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरने कारला बाजूने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील प्रवासी त्यात अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हायड्राच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला.

Muzaffarnagar Dumper Car Accident:
Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

या कारमधून एकूण सात जण प्रवास करत होते. यामध्ये चालक आदेश कुमार आणि निशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राखी, गोनी, कुसुम, रूबी आणि वैष्णवी हे जखमी झाले होते. उपचारादरम्यान निशा आणि गोनी यांचाही मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला. सध्या तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.

Muzaffarnagar Dumper Car Accident:
Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा, एसपी सिटी अमृत जैन, एसपी ट्रॅफिक अतुल कुमार चौबे आणि क्षेत्राधिकारी सदर सुनील कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बचावकार्याची माहिती घेत त्यांनी जखमींना योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. मृतक आणि जखमींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com