Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Punjab Bus Accident: पंजाबमध्ये मनालीवरून येणाऱ्या पर्यटकांच्या बसला भीषण अपघात झाला. बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू
Punjab AccidentSaam tv
Published On: 
  • पंजाबमध्ये पर्यटकांची बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

  • मनालीहून परतणाऱ्या पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात

  • पंजाब बस अपघातात तीन जणांचा मृत्यू

  • मजारी गावाजवळ पर्यटक बसचा भीषण अपघात झाला

  • पर्यटकांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन खाली कोसळली

  • चालकाला झोप लागल्याने बसचा अपघात झाल्याचा संशय

पंजाबमध्ये भीषण अपघातामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पर्यटकांना घेऊन येणारी बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली. पंजाबमधील बंगाजवळील मजारी गावामध्ये आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण रस्ते अपघात झाला. मनालीहून परत येणारी पर्यटकांची बस अनियंत्रित होऊन उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि काही इतर पर्यटक या बसमधून प्रवास करत होते. बस चालवताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. बस अनियंत्रित होऊन उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या अपघातात बस चालक आणि एलपीयूच्या एका विद्यार्थ्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. मृतांची आणि जखमींची नेमकी संख्या प्रशासनाकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. अपघाताच्या वेळी चालकाला झोप लागली असावी असा संशय आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू
Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

या भीषण रस्ते अपघातामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस, बचावपथकांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची आणि जखमींची नेमकी संख्या प्रशासनाकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. पण मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू
Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com