

अभिजीत दिपकेंना पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला
आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके यांना पोलिस ठाण्यात नेले
चहा प्यायला चला म्हणत अभिजीत दीपकेंना पोलिस ठाण्यात नेले
मुंबई पोलिस आणि अभिजीत दीपके व्हायरल व्हिडीओ
मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील अभिजीत दीपके या आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनाच्या आधी मुंबई पोलिसांनी अभिजीत दीपके यांना चहाच्या बहाण्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके मुंबईत दाखल झाले. गुरूवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत फेरफटका मारला. संध्याकाळच्या सुमारास ते मरीन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारत असताना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेले. चहा प्यायला चला असे म्हणत त्यांना पोलिस ठाण्यात नेत बसवलं आणि काही वेळानंतर सोडून देण्यात आले. याचा व्हिडीओ अभिजीत दिपकेंच्या सहकाऱ्याने तयार केला. तो व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अभिजीत दीपके यांना पोलिसांनी अटक केली अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण स्वत: अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मला अटक करण्यात आली नसल्याचे सांगितले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिजीत दीपके पोलिसांना सांगत आहेत की, ताब्यात घ्यायचे असेल तर अधिकृत सांगा. मात्र चहा पिण्यासाठी तुम्हाला बोलावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे.पण या निमित्ताने आपल्याला डिटेन करण्याचा प्रयत्न होता का?, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.
शुक्रवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता का? याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही. मात्र काही काळानंतर अभिजित दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बसवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची घोषणा केली.
मात्र शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्याने आणि न्यायालयाच्या नियमांमुळे मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. तरीही सीजेपीकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.