Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Nagpur Wardha Accident News : नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरात भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीसह चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून एम्स नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
Nagpur Wardha Road Accident News
Nagpur Wardha Road Accident News Saam Tv
Published On: 
Summary
  • नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरात भीषण अपघात

  • एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  • सहा वर्षांचा मुलगा गंभीर

  • अपघातानंतर ट्रेलर चालक फरार

नागपूर वर्धा मार्गावर जामठा परिसरात भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता नाईक आणि दोन मुलांसह दुचाकीवरून वर्धा मार्गाने प्रवास करत होते. जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता नाईक आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन यांचा मृत्यू झाला. तर सहा वर्षांचा तन्मय नाईक गंभीर जखमी झाला आहे. तन्मयला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Nagpur Wardha Road Accident News
Earthquake : सकाळीच हिंगोलीत प्रचंड खळबळ! भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; रिश्टर स्केलवरील नोंद पाहून सगळेच हादरले

दरम्यान, अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. रोजगारासाठी ते कुटुंबासह नागपूर परिसरात राहत होते आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये काम करत होते.

Nagpur Wardha Road Accident News
Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

कामानिमित्त आणि कौटुंबिक कारणाने प्रवास करत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू आणि सहा वर्षांच्या मुलाची गंभीर अवस्था यामुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातामुळे वर्धा मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगाचा आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com