महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या माघारीचा वेग वाढला
राज्याच्या जवळपास निम्म्या भागातून मॉन्सून परतला
पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील आणखी भागांतून मॉन्सून माघारी जाण्याची शक्यता
Maharashtra Today Weather Heatwave Temprature Update News राज्यावर यंदा एल निनोचं संकट असल्याकारणाने पावसाने उशिराने हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसाने नागरिकांना मात्र घामाघूम करून सोडलं. त्यानंतर जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. मात्र आता देशभरात पावसाने आपली पाठ फिरवली असून तो माघारी फिरण्याच्या वाटेवर आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडा भलताच त्रासदायक ठरत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काल राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आज देखील उकाडा कायम राहणार असून संध्याकाळनंतर वातावरणात काहीसा थंडावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत असतानाच आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास वेगाने सुरू केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या मोठ्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली असून उत्तर भारतातील अनेक राज्यांसह महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातूनही मॉन्सून परतला आहे. यंदा १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात झाली होती. त्यानंतर २३ सप्टेंबरपर्यंत देशाच्या वायव्य भागातील बहुतांश परिसरातून मॉन्सूनने माघार घेतली. आता परतीच्या प्रवासाने वेग घेतला असून उत्तर भारतातील उर्वरित भागासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतूनही मॉन्सून परतला आहे.
सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे या भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली असून कोरडे उत्तरेकडील वारे वाहू लागले आहेत. मॉन्सूनच्या माघारीसाठी आवश्यक असलेल्या पूरक हवामान परिस्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाने या भागांतून मोसमी वारे परतल्याचे जाहीर केले आहे.
पुढील काही दिवसांत मॉन्सून आणखी माघारी जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांतूनही मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता ऑक्टोबर हिटचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.