LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

Delhi Free LPG Cylinder Government Scheme : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेशन कार्डधारक कुटुंबांना LPG सिलिंडरसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. कोणाला लाभ मिळेल, पात्रता, नियम आणि DBT पेमेंटची माहिती जाणून घ्या.
Delhi LPG Cylinder News
Delhi LPG Cylinder NewsAI Image
Published On: 
Summary
  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी LPG आर्थिक मदत योजना लागू

  • दिल्लीतील नागरिकांना मिळणार लाभ

  • दरवर्षी दोन LPG सिलिंडरच्या किंमतीइतकी आर्थिक मदत देण्याची घोषणा

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने सरकारकडून रेशन कार्डधारक कुटुंबांना LPG सिलिंडरसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना दिल्लीसरकारने लागू केली आहे. यामुळे दिल्लीतील नागरिकांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे. मात्र, ही मदत नेमकी कोणाला मिळणार आणि त्यासाठी काय नियम आहेत, जाणून घेऊया.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, दिल्लीतील रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना दरवर्षी दोन LPG सिलिंडरच्या किंमतीइतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत होळी आणि दिवाळी या दोन सणांच्या काळात देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिन्यात LPG सिलिंडर रिफिल केलेला असणे आवश्यक नाही. फ्री सिलिंडरसाठीचे पैसे कुटुंबातील ज्या व्यक्तीचा नंबर रजिस्टर असेल त्याच्या खात्यात येणार आहेत. यासाठी बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे.

Delhi LPG Cylinder News
Hingoli Drought : हिंगोलीत भीषण दुष्काळ, ६ शेतकऱ्यांनी आयुष्याचा दोर कापला; कुटुंबियांना अश्रू अनावर

या योजनेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, रेशन कार्डधारक कुटुंब LPG वापरत असो किंवा स्वयंपाकासाठी PNG म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅसचा वापर करत असो, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच, केवळ LPG कनेक्शन असलेल्या कुटुंबांपुरती ही योजना मर्यादित राहणार नाही. सरकारच्या अंदाजानुसार या योजनेवर दरवर्षी सुमारे 242.77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. LPG च्या किमती, केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी आणि लाभार्थ्यांच्या संख्येत होणाऱ्या बदलानुसार हा खर्च कमी-जास्त होऊ शकतो.

Delhi LPG Cylinder News
Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

दरम्यान, दिल्लीमध्ये सध्या 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत 942 रुपये आहे. दुसरीकडे, 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात अलीकडे 62.59 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेशनन कार्डधारक कुटुंबांना सरकारच्या या आर्थिक मदतीचा फायदा कधी आणि किती रकमेच्या स्वरूपात मिळतो, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com