Hingoli Drought : हिंगोलीत भीषण दुष्काळ, ६ शेतकऱ्यांनी आयुष्याचा दोर कापला; कुटुंबियांना अश्रू अनावर

Maharashtra Hingoli Drought Farmer Sucide News : हिंगोलीत कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. २० दिवसांत सहावी घटना असल्याची माहिती आहे.
Hingoli Farmer Suicide Amid Maharashtra Drought Crisis
Hingoli Farmer Suicide Amid Maharashtra Drought Crisis AI Image
Published On: 
Summary
  • हिंगोली तालुक्यातील इसापूर गावात अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल वाढवे यांच्या आत्महत्येची घटना

  • मागील २० दिवसांत जिल्ह्यातील ही सहावी शेतकरी आत्महत्या

  • कमी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती

राज्यावर असलेल्या एल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले. परिणामी तापमान वाढले, शेतीला पुरेसा पाणीपुरवठा न मिळाल्याने पिके करपली आणि शेतकऱ्यांपुढे नवीन आव्हान येऊन ठेपल. अशातच आज सरकारने २६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दुसरीकडे दुष्काळ जाहीर करण्यापुर्वीच हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेनी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगोली तालुक्यातील इसापूर गावातील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी स्वतःच्या शेतातील बांधावर गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मागील वीस दिवसांत जिल्ह्यातील ही सहावी शेतकरी आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. विठ्ठल वाढवे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. वाढवे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलाने शेताकडे धाव घेतली. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी आपल्या आईला धीर देताना वाढवे यांचा चिमुकला मुलगाही धाय मोकळून रडला. या घटनेमुळे संपूर्ण इसापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Hingoli Farmer Suicide Amid Maharashtra Drought Crisis
Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पिके सुकत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने कर्ज, शेतीवरील खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांचा ताण शेतकऱ्यांवर वाढत असल्याचे चित्र आहे.

Hingoli Farmer Suicide Amid Maharashtra Drought Crisis
Political News : मोठी बातमी! शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, मागील काही दिवसांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. औंढा तालुक्यातील कमलबाई कांदे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. तसेच कळमनुरी तालुक्यातील सेल्सुरा येथील दत्तराव घुगे, औंढा तालुक्यातील उमरा येथील बालाजी बोंगाणे, हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील राजेश जाधव आणि वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जगदीश दळवी यांनीही आत्महत्या केल्याची माहिती आहे.या आत्महत्यांना जबाबदार कोण? कोणाचा तरी जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते का? असे संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच दुष्काळ जाहीर केला आता अंमलबाजवणी कधी करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com