Accident News : मध्यरात्री नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी

Nashik Bus Accident News : नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाट परिसरात नाशिक-अहमदाबाद खासगी बसचा भीषण अपघात. दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले.
Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident NewsSaam tv
Published On: 
Summary
  • नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाट परिसरात खासगी बसचा भीषण अपघात

  • दुर्घटनेत २ प्रवाशांचा मृत्यू

  • अपघातात ८ प्रवासी जखमी; जखमींवर उपचार सुरु

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या सावळघाट परिसरात रात्रीच्या सुमारास नाशिक-अहमदाबाद प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून अहमदाबादच्या दिशेने खासगी बस प्रवास करत होती. सावळघाटातील वळणाच्या परिसरात रात्रीच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत महेंद्र पाल आणि राहुल ओझा या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही गुजरात राज्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik Bus Accident News
Gold Ring : हातांचे सौंदर्य वाढवतील सोन्याच्या अंगठ्यांचे 'हे' ५ ट्रेंडी डिझाईन्स; पाहा लेटेस्ट कलेक्शन

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती थेट पंतप्रधान कार्यालयाला (PMO) देण्यात आल्याने संबंधित यंत्रणांनीही तातडीने हालचाली सुरू केल्या. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य वेगाने राबवण्यात आले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

Nashik Bus Accident News
Lemon Water : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

या अपघातामुळे सावळघाट परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. प्रशासन आणि पोलिसांकडून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला की अन्य कोणत्या कारणामुळे दुर्घटना घडली, याचा तपास केला जात आहे. रात्रीच्या वेळी घाट परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com