Lemon Water : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

Shreya Maskar

'या' बिया लिंबू पाण्यात मिसळा

चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. तर लिंबामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. लिंबू पाण्यात चिया सीड्स घालून ते पाणी प्या.

Mix these seeds in lemon water | pinterest

पचनक्रियेला मदत

चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आतड्यांची हालचाल नियमित ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होऊ शकते. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर फुगतात आणि त्यातील फायबरमुळे तृप्तीची भावना वाढू शकते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते.

Aids digestion | pinterest

वजन नियंत्रणात

चिया सीड्समधील फायबर आणि प्रथिने तृप्ती वाढवतात. त्यामुळे एकूण कॅलरीचे सेवन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

In weight control | pinterest

हृदयाचे आरोग्य

चिया सीड्समधील ओमेगा-३ प्रकारचे ALA आणि फायबर संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Heart health | pinterest

मधुमेह-बीपी

फायबरयुक्त पदार्थ जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची वाढ तुलनेने मंद करण्यास मदत करू शकतात. चिया सीड्समुळे हाय बीपी ही नियंत्रणात राहते.

Diabetes-BP | pinterest

मजबूत हाडं

चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची खनिजे असतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन C असते. हे शरीरातील अँटीऑक्सिडंट संरक्षणाला हातभार लावते आणि लोहाचे शोषण सुधारण्यास मदत करते.

Strong bones | pinterest

कसे घ्यावे?

१ ग्लास पाण्यात १–२ चमचे चिया सीड्स घालून साधारण १५–३० मिनिटे भिजवावे. त्यानंतर त्यात थोडे लिंबू पिळून घेऊ शकता. सुरुवातीला कमी प्रमाणात चिया सीड्स घेणे योग्य, कारण अचानक जास्त फायबर घेतल्यास गॅस, पोट फुगणे किंवा अस्वस्थता होऊ शकते.

How to take | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ८ तासांची पुरेपूर झोप काढली, पण तरीही थकल्यासारखं वाटतं; असू शकतात 'ही' ५ गंभीर कारणे

Sleeping | AI PHOTO
येथे क्लिक करा...