Shreya Maskar
८ तास झोपूनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल, तर केवळ झोपेचा कालावधी नव्हे तर झोपेची गुणवत्ता, जीवनशैली आणि आरोग्य समस्या कारणीभूत असू शकते.
रात्री मोठ्याने घोरणे, झोपेत श्वास थांबणे, गुदमरल्यासारखे होणे यामुळे झोप वारंवार खंडित होते. त्यामुळे ८ तास बेडवर असूनही शरीराला पुरेशी आरामदायी झोप मिळत नाही. दिवसभर झोप येणे आणि सकाळी थकवा ही याची लक्षणे असू शकतात.
हिमोग्लोबिन कमी असल्यास शरीराच्या ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता कमी होऊ शकते. परिणामी सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर, धाप लागणे किंवा हृदयाची धडधड जाणवू शकते.
थायरॉइड हार्मोन्स कमी किंवा जास्त झाल्यास ऊर्जा आणि शरीराच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः हायपोथायरॉइडिझममध्ये थकवा, सुस्ती आणि एकाग्रता कमी होण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.
थकव्याबरोबर खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे असतील, तर रक्तातील साखरेची तपासणी करण्याची गरज असू शकते.
मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. त्यामुळे ८ तास झोपूनही सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर ऊर्जा कमी जाणवू शकते.
उशिरापर्यंत स्क्रीन वापरणे, अनियमित झोपेची वेळ, रात्री वारंवार जाग येणे, कॅफिन/अल्कोहोल किंवा कमी शारीरिक हालचाल यामुळे झोपेचा आरामदायीपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे झोपेचे तास पुरेसे असूनही थकवा राहू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.