ममता बॅनर्जींचे 16 खासदार नॉट रिचेबल; महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती? मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

Tmc Mp Rebellion Mamata Banerjee Delhi Crisis: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वाढली आहे. 16 खासदार नॉट रिचेबल असून 22 खासदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
TMC supremo Mamata Banerjee departs for Delhi amid reports of a major rebellion within party MPs.
TMC supremo Mamata Banerjee departs for Delhi amid reports of a major rebellion within party MPs.saam tv
Published On

पश्चिम बंगालमध्ये टीमसीने (TMC) सत्ता गमावल्यानंतर आणि आता 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत टीएमसीच्या संसदीय पक्षात मोठी फुट पडण्याची तयारी पूर्ण झाल्याची चर्चा आहे. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत येणार आहे. त्याचवेळी किमान 22 खासदार बंड पुकारून स्वतःलाच खरी टीएमसी (TMC) घोषित करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. या संभाव्य गटाचे नेतृत्व बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार करणार असल्याचे बोलले जात आहे. या गटात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही खासदारांचा समावेश आहे.

TMC supremo Mamata Banerjee departs for Delhi amid reports of a major rebellion within party MPs.
Crime News: धक्कादायक...! रील्स बनवते म्हणून पतीने केली पत्नीची हत्या; आईविना २ मुलं झाली पोरकी

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. पत्रकारांशी बोलताना समिक भट्टाचार्य म्हणाले, आम्हाला सतत फोन येत आहेत. तृणमूलचे खासदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. तृणमूल काँग्रेस आता भूतकाळात जमा झाल्याचे ते म्हणाले.

TMC supremo Mamata Banerjee departs for Delhi amid reports of a major rebellion within party MPs.
Rain Alert india : पुढील २ दिवस सतर्क राहा! १७ राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट, गारपीटीचा तडाखाही बसणार

संसदेत अधिकृत फूट मान्य होण्यासाठी आणि दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्र ठरण्यापासून वाचण्यासाठी बंडखोर गटाला दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनानंतर लोकसभेत टीएमसीचे (TMC) 28 सदस्य आहेत, तर राज्यसभेत 13 सदस्य आहेत. त्यामुळे बंडखोरांना किमान 19 लोकसभा आणि 9 राज्यसभा सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या दोन्ही सभागृहांतील मिळून 22 खासदार या बंडखोर गटात सामील झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खासदार सोमवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन स्वतःलाच खरी तृणमुल काँग्रेस घोषित करणार आहेत. ममत बॅनर्जींना मोठा दणका बसणार असून त्या दिल्लीत असतानाच हा राजकीय बॉम्ब फुटणार असल्याचे बोलले जात आहे.

TMC supremo Mamata Banerjee departs for Delhi amid reports of a major rebellion within party MPs.
कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

TMC चे खासदार सुखेंदु शेखर राय यांनी ही या राजकीय घडामोडींना दुजोरा दिला असून ही फुट आता अटळ आहे, फक्त वेळेचा प्रश्न आहे. तसेच 16 पैकी 15 खासदारांचे फोन बंद असल्याचे ही ते म्हणाले. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्ती, माजी खेळाडू आणि पहिल्यांदाचा निवडून आलेले खासदारही आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात जस दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना आहे, अशीच राजकीय पुरावृत्ती बंगालमध्ये देखील होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com