TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार

tmc crisis as 23 mps reportedly in touch with rebel group : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस फुटण्याच्या मार्गावर आहे. पक्षाचे २३ खासदार हे बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार
mamata banerjeesaam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींना १५ वर्षांनंतर सत्ता गमवावी लागलीय. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला ८० जागांवर विजय मिळाला होता. यापैकी ५८ आमदारांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जीच्या नेतृत्वात बंडखोरी केली. या गटानं ऋतब्रत बॅनर्जींना विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून घोषित केले आहे. त्यांना विधानसभा अध्यक्षांनीही मान्यता दिली आहे. यानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे खासदारही बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

रिपोर्ट्सनुसार, तृणमूल काँग्रेस (TMC) चे २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये २० खासदार प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जींच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. थोडा संयम ठेवा, पुढील काळात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोलकातामध्ये शुक्रवारी ऋतब्रत बॅनर्जी यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी २० खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला. त्यावर गेल्या सात दिवसांत माझी कोणत्याही खासदाराशी कसलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे खासदार नेमकं काय पाऊल उचलतात याबाबत काहीही सांगू शकत नाही, असे उत्तर ऋतब्रत यांनी दिले.

मी वर्तमानकाळात जगतोय. उद्या काय घडेल याबाबत काही सांगू शकत नाही, असेही ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, तृणमूल काँग्रेसमध्ये पुढच्या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटू शकतो. २३ खासदार बंडखोर गटासोबत जाऊ शकतात. हे सर्व खासदार अभिषेक बॅनर्जींवर नाराज आहेत. हे सर्व खासदार आमदारांप्रमाणेच वेगळा गट करू शकतात, अशी चर्चा आहे.

तृणमूल काँग्रेसचे लोकसभेमध्ये २८ खासदार आहेत. त्यामुळे पक्षांतर कायद्यांतर्गत होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी वेगळ्या गटाला १९ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असणार आहे. खासदारांच्या बंडखोरांच्या गटाचं नेतृत्व पक्षाचे एक वरिष्ठ खासदार करत असल्याची चर्चाही आहे. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे १३ खासदार आहेत. राज्यसभेत वेगळ्या गटाला मान्यता मिळण्यासाठी ९ खासदारांच्या पाठिंब्याची गरज असणार आहे.

TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक तगडा झटका; नीकटवर्तीय नेत्यानं दिला महापौरपदाचा राजीनामा

दुसरीकडे, पक्षातील बंडखोरीनंतर ममता बॅनर्जी देखील अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी कोलकाताच्या कालीघाट स्थित निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावली आहे. ५ जून रोजी संध्याकाळी चार वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जींनी सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलावलं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, ममता बॅनर्जी कोणता महत्वाचा निर्णय घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार
TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com