Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक तगडा झटका; नीकटवर्तीय नेत्यानं दिला महापौरपदाचा राजीनामा

mamata banerjee faces fresh setback after mayor resignation: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यांचा नीकटवर्तीय आणि महापौरपदी असलेल्या नेत्याचा पदाचा राजीनामा दिला आहे.
ममता बॅनर्जींपुढच्या अडचणी संपेनात! आणखी एका नेत्यानं महापौरपदाचा दिला राजीनामा
mamata banerjee saam tv
Published On

पश्चिम बंगालमधील सत्ता आणि मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांना कठीण काळ अनुभवावा लागत आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष विखुरला आहे. पक्षाच्या ८० पैकी ६० आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. पक्षातील बंडखोर गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यताही दिली आहे. या गटाचं नेतृत्व ऋतब्रत बॅनर्जी करत असून, त्यांच्याविरोधात पक्षाने दोन दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. आता ममता बॅनर्जींविरोधात अंतर्गत नाराजी उफाळली आहे. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नेते एकेक करून त्यांना सोडून जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा चक्रवर्ती यांनी बिधाननगर पालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय कृष्णा चक्रवर्ती यांनी वैयक्तिक कारण सांगून महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ममतांच्या आणखी एका शिलेदारानं महापौरपदाचा राजीनामा दिला होता. बुधवारी फिरहाद हकीम यांनी कोलकाताचं महापौरपद सोडलं होतं. २०१८ पासून कोलकाताच्या महापौरपदाची जबाबदारी ते सांभाळत होते.

ऋतब्रत बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसमध्ये पाडली फूट

तृणमूल काँग्रेस नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना एकप्रकारे आव्हान दिलं आहे. एकेकाळी ऋतब्रत हे ममतांच्या निष्ठावंत नेत्यांच्या फळीतील अग्रस्थानी असलेले नेते होते. विरोधी पक्षनेता निवडण्याच्या प्रस्तावावर बनावट स्वाक्षरी केल्याच्या आरोपांवरून वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर ऋतब्रत आणि संदीपन साहा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर ऋतब्रत यांनी दोन दिवसांच्या आतच पक्षात फूट पाडली. त्यांनी ५८ आमदार म्हणजेच दोन-तृतीयांशहून अधिक आमदारांचा पाठिंबा घेऊन ममता बॅनर्जींना आव्हान दिलं.

ममता बॅनर्जींपुढच्या अडचणी संपेनात! आणखी एका नेत्यानं महापौरपदाचा दिला राजीनामा
मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल पक्षात फूट पडण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. आमदार अरुनवा सेन यांच्या म्हणण्यानुसार, अभिषेक यांच्या कारभारावर आक्षेप आहे. ममता बॅनर्जी आजही त्यांच्या नेत्या आहेत. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर त्यांची नाराजी आहे. जे मुस्लीम समाजातील आमदार आहेत, तेच ममतांची ताकद होते असे मानले जात होते. पण त्यातील १७ आमदारांनी त्यांची साथ सोडली आणि ते ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासोबत गेले. त्यातील आमदार अखरुज्जमा यांच्यावर ऋतब्रत यांनी मोठी जबाबदारी दिली.

ममता बॅनर्जींपुढच्या अडचणी संपेनात! आणखी एका नेत्यानं महापौरपदाचा दिला राजीनामा
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये उभी फूट, एकाचवेळी ६० आमदारांची सोडचिठ्ठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com