मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

Mamata Banerjee News : भाजपच्या विरोधात लढाई सुरू केल्याचे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. भाजपवर जोरदार टीका देखील बॅनर्जी यांनी केली.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee saam tv
Published On
Summary

सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी आक्रमक

ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल

रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी टीएमसीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट दाखवावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये दहशतीचे राज्य सुरू झालं आहे. आता त्यांच्याविरोधात नैतिक आणि राजकीय लढाई सुरू झाली आहे. एनजीओ आणि इतर सामजिक संघटनांना आंदोलनांत सामील होण्याचं आवाहन देखील ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी कालीघाट चौक, मुक्तदल आणि अग्निशमन दलाच्या स्टेशनसमोर रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु तिन्ही जागांवर ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यलयात जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Mamata Banerjee news
आम्ही हरलेलो नाही; ममता बॅनर्जी यांना पराभव अमान्य, कुणाला ठरवलं व्हिलन ?

पश्चिम बंगालमध्ये आता हुकूमशाही असून टीएमसीला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे निर्भीड आहेत. ते मातृभूमीवर प्रेम करतात, त्यांनी एकजूट दाखवावी. मी स्वत:वकील आहे. मी उघडपणे भाजपच्या विरोधात लढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

टीएमसीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, 'बंगालच्या कार्यकर्त्यांवर त्रास दिला जात आहे. राज्यात दलित समजातील एक ९२ वर्षीय वृद्ध महिलेला घर सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागलाय. भाजपने त्याच कुटुंबातील एका नवविवाहित वधूलाही धमकावून घर रिकामे करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेत्याच्या घराबाहेर गुंडगिरी करत आहे. पोलीस गप्प आहेत'.

Mamata Banerjee news
West Bengal Politics : ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास नकार, निवडणूक आयोगानं उचललं मोठं पाऊल

ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटलं की, मी २०११ सालापासून सत्तेत आहे. मी कधीही हिंसाचार घडून दिला नाही. कोणालाही त्रास दिला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सुरक्षेसाठी स्वत:ची बुलेटप्रुफ कार पाठवली होती. त्यांना झेड + सुरक्षा दिली होती.परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर तातडीने त्यांची सुरक्षा हटवली. त्यांच्या इतर सेवा देखील बंद केल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com