कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

Abhijit Dipke Death Threat Latest News: कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर दिपके यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरात पोलीसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून धमकी नेमकी कुणाकडून देण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून विविध कोनातून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून दिपके यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com