Cockroach Janata Party Founder Abhijeet Dipke Receives Death Threat : कॉकरोच जनता पार्टी (CJP) या राजकीय पक्षाच्या संस्थापकांना अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे किंवा अंतर्गत राजकीय वैमनस्यातून ही धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
अभिजित दीपके यांनी एक्स अकाऊंटवर धमकी आल्याची माहिती दिली. दीपके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये धमकी आलेल्या फोन क्रमांकासह चॅटिंग शेअर केले आहे. मला नुकतीच जिवे मारण्याची धमकी आली आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सोशल अकाउंट बंद कर, तुला पैसे मिळतील. नाहीतर अमेरिकेतही तुला मारून टाकले जाईल, असे त्या क्रमांकावरून दीपके यांना धमकी आली आहे. दीपक दीपके यांनी तो संवादच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
नेटकऱ्यांचा संताप -
अभिजित दीपके यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणत एका युजरने त्यांना धीर दिला आहे. तर अन्य एका यूजरने हे तुझ्याच एकाद्या व्यक्तीने मुद्दाम केलेले असेल, असे म्हणत संशय व्यक्त केला आहे. तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही सर्व झुरळं तुझ्यासोबत आहोत, असे एकाने पोस्टमध्ये म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी दीपके यांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहनही केलेय.
अभिजित दीपकेंना अटकेची भीती -
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांना अटकेची भीती आहे. त्यांनी रेड माइकला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत जाताच अटक केली जाईल, अशी भीती व्यक्त केली. दीपके सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. तिथे त्यांनी पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेतले आहे. ते पुढील महिन्यात भारतात परतणार आहेत. पण त्याआधीच त्यांनी अटकेची भीती व्यक्त केली आहे.'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, दिल्लीत पाऊल ठेवताच अटक होण्याची भीती वाटते.
"आत्ताच माझा पदवीदान समारंभ झाला. मी पुढच्या महिन्यात भारतात परत येण्याची योजना आखत आहे. आणि सध्याची परिस्थिती अन् पद्धत पाहता, मला दिल्ली विमानतळावर उतरल्या उतरल्या दिल्ली पोलीस ताब्यात घेऊन तिहार तुरुंगात नेतील," असे दीपकेंनी मुलाखतीत सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.