Mumbai Crime : प्रियकराच्या ड्रग्जसाठी नातीनेच आजीचे दागिने चोरले; लग्नानंतर ‘नवीन आयुष्य’ सुरू करण्याचा होता प्लॅन

Mumbai Couple Arrested : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात १९ वर्षीय तरुणीने प्रियकरासोबत मिळून आजीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघड झाली आहे.
Love Affair Case
Love Affair CaseSAAM TV (File Photo)
Published On

Mumbai Jewellery Theft News : कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सख्ख्या आजीच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत.

लॉकर तोडून चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय महिलेने ४ मे रोजी पुण्यात आपल्या मूळ गावी जाण्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने कपाटातील लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. १४ मे रोजी हे कुटुंब मुंबईत परतले असता, त्यांना कपाटाचे लॉकर तुटलेल्या अवस्थेत आढळले आणि आतील दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

Love Affair Case
मनोज जरांगेंना भेटायला निघाले, प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी; २ जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच होता संशय

आजीच्या घरात वारंवार ये-जा असल्यामुळे घरातील सदस्यांना सुरुवातीपासूनच नातीवर संशय होता. कुटुंबीयांनी विचारपूस केली असता, तिने प्रियकरासोबत मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. सुरुवातीला तिने चोरलेले दागिने परत देण्याचे आश्वासन दिल्यामुळे कुटुंबाने पोलिसांत तक्रार करणे टाळले होते.

दागिने देण्याऐवजी प्रियकरासोबत पळाली

मात्र, दागिने परत करण्याऐवजी १७ मेच्या पहाटे तरुणी आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली. तिने स्वतःचा मोबाईल फोनही बंद केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने चारकोप पोलिस ठाण्यात धाव घेत एफआयआर (FIR) दाखल केला.

Love Affair Case
Weather Monsoon Update: मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

ड्रग्जचे व्यसन आणि लग्नाचा प्लॅन

पोलिस तपासात या चोरीमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. तरुणीच्या प्रियकराला ड्रग्जचे व्यसन असून, त्यासाठी पैसे उभे करणे आणि त्यानंतर दोघांनी लग्न करून नवीन आयुष्य सुरू करणे, या उद्देशानेच त्यांनी हा चोरीचा कट रचला होता. चारकोप पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत १८ मे रोजी या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Love Affair Case
Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे ₹३००० खात्यात जमा, आता मे महिन्याचे ₹१५०० कधी? संभाव्य तारीख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com