

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana May Installment Update : राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे ३००० रूपये खात्यात जमा झाले आहेत. काही महिलांच्या खात्यात अद्याप लाभ जमा झालेला नाही, त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो. ईकेवायसीनंतर राज्यातील तब्बल ७० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समोर आले आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे खात्यात पैसे जमा (Maharashtra Ladki Bahin payment update) झाल्यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी (₹1500 installment latest news) मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana May installment date
राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे. आता मे महिन्याचा हप्ताही लवकरच जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे ते १४ मे यादरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्यांचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होऊ शकत. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे. त्यामुळे १० जूननंतरच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होईल.
राज्यात किती महिला अपात्र ठरल्या ? (Ladki Bahin e-KYC update Maharashtra)
ईकेवायसीनंतर राज्यात १ कोटी ७० लाख महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर जवळपास ७० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या सर्व अपात्र लाडक्या बहिणींना यापुढे १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारचे तब्बल दहा हजार कोटी रूपये वाचणार असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना पुन्हा ईकेवायसी करता येणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा बाल विकास विभागात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पण सरकारकडून यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले. ईकेवायसाठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून महिलांनी थेट बँक खात्यात रक्कम तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.