कोलकत्ता येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील्स बनवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पतीकडून आपल्याच पत्नीची गळा चिरून हत्या करण्यात आलीये. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक ही घटना ( दि.२४) शुक्रवारी रोजी हरिनारायणपूर येथे घडलीय. आरोपी परिमल बैल आणि मयत महिला अपर्णा यांचे १७ वर्षापूर्वी लग्न झाले होते. आरोपी परिमल हा व्यवसायाने गंवडी आहे. या जोडप्याला एक लहान मुलगा आणि एक मुलगी आहे.
पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेला इन्स्टांग्रामवर रील्स बनवण्याची सतत सवस लागली होती. तसंच इन्स्टाग्राममुळे तिचा नवा फ्रेंड सर्कल निर्माण झाला होता. या फ्रेंड सर्कलमध्ये अपर्णाचे अनेक मित्र- मैत्रिणीही बनल्या होत्या आणि ती त्यांच्याशी सारखी बोलत असे. विशेष म्हणजे एका मित्राशी ती बोलीली आरोपी पतीस जराही आवडले नव्हते. परिमला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये सारखे वाद होत असे. रोजच्या वादाला कटांळून महिला काही महिन्यांसाठी पतीला सोडून माहेरी राहण्यास गेली होती.
मयत महिलेचा मुलगा घरी परतल्यानंतर या घटनेची वाच्छता...
मयत महिलेचा मुलगा काल्सवरून घरी परतताच त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली दिसली. आईला बघून मुलाने आरडा-ओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत याबद्दलची माहिती जवळील पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांशी या कुंटुंबियाबद्दल माहिती घेतली. मयत महिलेच्या मुलाची चौकशी करताना त्याने सांगितले की, माझ्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणे होत असत. एवढेच नाही तर गुरूवारीही दोघांमध्ये वाद झाले होते आणि वडिलांनी आईला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून अपर्णाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले. हत्या केल्यानंतर आरोपी परिमल हा फरार झाला आहे. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जवळील रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून फरार परिमलचा शोध सुरु आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.