घराच्या जागेवरुन झालेल्या वादात माय-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे. (Latest Marathi News)
गुरुवारी संध्याकाळी किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि अडीच वर्षांचा स्वराज येणारे यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये शितल आणि स्वराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Crime News)
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
श्रीमंदिलकर आणि येणारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.