Rahul Gandhi: हे ट्रेड डील नाही तर होलसेल सरेंडर; राहुल गांधींच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

Rahul Gandhi trade deal statement: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यांनी सरकारच्या व्यापार करारावर टीका केलीये.
Rahul Gandhi trade deal statement
Rahul Gandhi trade deal statementsaam tv
Published On

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबत झालेल्या करारावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. या करारामुळे अमेरिकेसाठी दरवाजे उघडले गेले असून भारताला याचा काहीही फायदा नसल्याचं म्हटलंय.

राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी प्रश्न केला की, अमेरिका आपल्याला तेल कोणाकडून खरेदी करायचं याबाबत सांगतेय? अमेरिका त्यांचे निर्णय कसे घेताता? सरकारने देश विकला आहे. अमेरिकेने तेल खरेदीवर निर्बंध लादले आहेत. आपण कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ट्रम्प कसं ठरवू शकतात?

Rahul Gandhi trade deal statement
Heart Attack Signs: हार्ट अटॅक येण्याआधी महिनाभर आधीच समजते, या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल

इतकंच नाही तर कृषी क्षेत्र देखील अमेरिकेसाठी खुलं करण्यात आलंय. सरकारने शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही. हा व्यापार करार म्हणजे पूर्णपणे सरेंडर आहे, असा घणाघात राहुल गांधींनी सरकारवर केलाय.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, येत्या काळात AI चे अनेक परिणाम होतील याबाबत मी सरकारला आताच इशारा देईन. इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये अग्रस्थानी असलेल्या कंपन्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेला फक्त भारताचा डेटा हवा आहे.

मी इकोनॉमिक सर्वे पाहिला आणि मला त्यात दोन गोष्टी आढळल्या. ठोस आणि खोल गोष्टी ज्या मला आवडल्या. पहिलं म्हणजे आपण अशा जगात राहतोय जिथे जियो पॉलिटिकल संघर्ष वाढतोय. अमेरिकेच्या वर्चस्वाला चीन, रशिया आणि इतर शक्ती आव्हान देतायत. आणि दुसरं म्हणजे आपण एनर्जी आणि फाइनेंशियल शस्त्रांच्या जगात राहतोय, असंही राहुल गांधी म्हणालेत.

Rahul Gandhi trade deal statement
Heart attack: हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण काय दिसून येतं? डॉक्टरांनी सांगितले संकेत

राहुल गांधी पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आणि एनएसए यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं की, युद्धाचं युग आता संपलं आहे. पण खरं तर आपण युद्धाच्या युगात जातोय. युक्रेनमध्ये युद्ध सुरुये, गाझामध्ये युद्ध सुरूये तर मिडल इस्टमध्ये युद्ध सुरुये आणि इराणमध्येही युद्धाचा धोका आहे.

Rahul Gandhi trade deal statement
Liver Cancer Symptoms: शरीरात हे ४ बदल दिसले तर समजा लिव्हरचा कॅन्सर झालाय; दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी जीवघेणं

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ज्यावेळी मार्शल आर्ट्समध्ये चोकिंग केलं जातं तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात भीती दिसते. त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आहे. एपिस्टाईन प्रकरणातील ३ मिलियन फाईल्स अजून समोर येणं बाकी आहे.

Rahul Gandhi trade deal statement
Viral Video: तंबाखू खाणार का? माकडाला खाऊ खातला मळलेला तंबाखू, माकडाच्या हटके करामतीचा व्हिडीओ व्हायरल

किरेन रिजीजूंनी फेटाळले आरोप

दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारवर केलेले सर्व आरोप केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी फेटाळून लावलेत. देशात असा कोणीही नाही जो भारताला विकू शकेल आणि विकत घेऊ शकेल. देशाला कधी चांगले पंतप्रधान मिळाले असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com