Heart attack: हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण काय दिसून येतं? डॉक्टरांनी सांगितलं कसे ओळखाल संकेत

Early signs of heart attack: हृदयविकाराचा झटका हा अचानक होणारा प्रसंग मानला जातो, पण तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की, शरीर आधीच काही सूक्ष्म इशारे देत असतं. हे इशारे वेळेत ओळखले तर जीव वाचवता येतो.
Heart Attack Symptoms
Heart Attack Symptomssaam tv
Published On

आपलं हृदय हे शरीरातील एक महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, असं डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. त्यामुळे आपण आपल्या हृदयाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मात्र असं असूनही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूंची संख्या काही कमी नाही. इंडियन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, २०२० मध्ये ३० ते ६० वयोगटातील तब्बल १९,२३८ लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत असल्याचं समोर आलं आहे. तर २०२१ मध्ये १८ ते ३० वयोगटातील २,५४१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

एका इंग्रजी वेबसाईटला माहिती देताना HCG हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिनेश राज यांनी सांगितलं की, हार्ट अटॅक म्हटलं की आपल्यासमोर छातीत तीव्र वेदना होत असलेला व्यक्ती कोसळतोय, असं चित्र समोर उभं राहतं. मात्र प्रत्यक्षात हार्ट अटॅक तसाच असतो असं नाही. याची सुरुवातीची लक्षणं फारच सौम्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

Heart Attack Symptoms
High Blood Pressure: औषधांशिवाय घरीच ठीक होईल हाय ब्लड प्रेशरची समस्या; डॉक्टरकडे जाण्याआधी ट्राय करा घरगुती उपाय

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, त्यामुळे या समस्येचं पहिलं लक्षण ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही जितक्या लवकर तुम्ही लक्षणं ओळखाल तितकं तुमच्या हृदयाच्या स्नायूचं नुकसान कमी होतं.

पहिलं लक्षण कोणतं दिसून येतं

डॉ. दिनेश यांच्या सांगण्यानुसार, अनेक लोकांमध्ये छातीत अस्वस्थता जाणवू लागते. यामध्ये एखाद्या टोकादार वस्तूने छातीत टोचल्यासारखं वाटू लागतं. या वेदना कशा असतात ते पाहूयात.

  • छातीवर जड दाब आल्यासारखं वाटू लागणं

  • छातीच्या मध्यभागी दुखणं

  • काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणारी वेदना.

  • वेदना सतत येऊन जात असेल

Heart Attack Symptoms
High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीतच त्रास होतो हा एक सामान्य गैरसमज आहे. खाली दिलेल्या भागांमध्ये कारण नसताना अस्वस्थता जाणवत असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या

  • डावा हात: हे एक प्रमुख लक्षण आहे, पण कधी कधी दोन्ही हातांमध्येही त्रास जाणवू शकतो.

  • जबडा आणि मान: अनेकदा दातदुखी किंवा घसा दुखतोय असं समजून दुर्लक्ष केलं जातं.

  • पाठ: विशेषतः खांद्यांच्या पाठीमागच्या मधल्या भागात त्रास जाणवतो.

सायलेंट लक्षणं कोणती

डॉ. दिनेश यांनी सांगितलंय की, महिला, वयोवृद्ध व्यक्ती आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ‘अटिपिकल’ म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी लक्षणं अधिक दिसतात. या व्यक्तींमध्ये सुरुवातीची लक्षण वेदना नसून खाली दिलेली लक्षणं असतात.

Heart Attack Symptoms
Blood Cancer: सततचा थकवा आणि ताप येत असेल तर दुर्लक्ष करू नका; ब्लड कॅन्सरची असू शकतात लक्षणं
  • अचानक प्रचंड थकवा- काही हलचाल न करताही मॅरेथॉन धावलात अशी अवस्था होणं.

  • कुठलाही शारीरिक ताण नसताना श्वास घ्यायला त्रास होणं.

  • मळमळ किंवा थंड घाम येणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com