Blood Cancer: सततचा थकवा आणि ताप येत असेल तर दुर्लक्ष करू नका; ब्लड कॅन्सरची असू शकतात लक्षणं

Early Warning Signs Of Blood Cancer: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत थकवा, अशक्तपणा आणि ताप ही सामान्य लक्षणे वाटू शकतात, पण ती रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.
Blood cancer symptoms
Blood cancer symptomssaam tv
Published On

ब्लड कॅन्सर हा सर्वात धोकादायक कॅन्सर मानला जातो. याची लक्षणं अचानक दिसून येत नाही. याचा हळूहळू तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा सारखे ब्लड कॅन्सर हे बोन मॅरोमध्ये सुरू होतात. ज्यामध्ये रक्ताच्या पेशी तयार होतात आणि त्यानंतर शरीराच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो.

लवकर निदान कसं करावं?

एका वेबसाईटला माहिती देताना अंबालाच्या पूजा सुपरस्पेशालिटी क्लिनिकचे तज्ज्ञ डॉ. दीपक सहोता यांच्या मते, रक्ताच्या कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास उपचार सोपे होऊ शकतात. जर या आजाराचं निदान वेळेत झालं तर यशस्वी उपचार होण्यास मदत होते आणि ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणासारख्या महत्त्वाच्या पर्यायांची शक्यताही दाट होते.

Blood cancer symptoms
Early stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर असल्यास केवळ सकाळच्याच वेळी शरीरात होतात हे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

सततच्या थकव्याला सामान्य समजू नका

जर जास्त काम न करताही अशक्तपणा, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि विश्रांती घेतल्यानंतरही काही फरक पडत नसेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ब्लड कॅन्सरमध्ये शरीर पुरेशा प्रमाणात हेल्दी लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही. ज्यामुळे अशक्तपणा येतो.

सतत इन्फेक्शन होणं

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणं हे देखील एक ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यामध्ये वारंवार सर्दी, ताप किंवा इन्फेक्शनचं प्रमाण गंभीर होत असेल तर ते धोक्याचं कारण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरात पांढऱ्या रक्तपेशी योग्य पद्धतीने काम करत नाहीयेत.

Blood cancer symptoms
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

लगेच दुखापत होणं

नाक किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं, लहान दुखापत झाली तरीही त्वचा काळी पडणं. किंवा त्वचेवर लालसर-जांभळ्या रंगाचे डाग पडणं हे प्लेटलेटच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. ल्युकेमियामध्ये ही लक्षणं सामान्य मानली जातात.

Blood cancer symptoms
Swollen Kidney Symptoms: डोळ्यांखाली सतत सूज येत असेल तर समजा किडनीचं कार्य बिघडलंय; किडनीला सूज आल्यावर दिसून येतात 'ही' 6 लक्षणं

वजन कमी होणं

जर डाएट किंवा व्यायामाशिवाय वजन कमी होत असेल तर काळजी करण्याचं कारण आहे. यामध्ये रात्री जास्त घाम येत असेल किंवा मान, बगलेत किंवा मांडीवर वेदनारहित गाठी येत असतील तर तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. ही लक्षणं विशेषत: लिम्फोमाशी संबंधित असू शकतात. त्याच वेळी, हाडं, पाठीचा कणा किंवा बरगड्यांमध्ये सतत वेदना होणं हे मल्टीपल मायलोमाचं लक्षण असू शकतं.

Blood cancer symptoms
Symptoms of throat cancer: घसा सुजलाय आणि गिळताना त्रास होतोय? घशाच्या कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com