Early stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर असल्यास केवळ सकाळच्याच वेळी शरीरात होतात हे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Stomach Cancer Symptoms In The Morning: पोटाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य पोटाच्या समस्यांसारखी दिसतात, ज्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
Early stomach cancer symptoms
Early stomach cancer symptomssaam tv
Published On

सध्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. यामध्ये पोटाचा कॅन्सर म्हणजेत गॅस्ट्रिक कॅन्सरचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून येतंय. हा एक गंभीर आजार असून याची लक्षणं सुरुवातीच्या काळात दिसून येत नाहीत. या कॅन्सरची सुरुवात पोटाच्या आतील थरांमध्ये होते आणि अनेक वेळा त्याची लक्षणं अगदी सुरूवातीच्या टप्प्यावर दिसतच नाहीत. त्यामुळे निदानही उशिरा होतं.

मात्र शरीर प्रत्येक आजाराबाबत आपल्याला काही ना काही संकेत देतं. त्यामुळे जर आपण सकाळच्या वेळची काही विशेष लक्षणं ओळखली तर या आजाराला सुरुवातीलाच पकडणं शक्य होऊ शकतं. पोटाच्या कॅन्सरची कोणती लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

सकाळी उठल्यावर पोटदुखी

जर दररोज सकाळी उठल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ती लक्षणं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. हा त्रास जेवणानंतर अधिक वाढू शकतो. जर हा त्रास सातत्याने होत असेल आणि नेहमीचं औषध घेऊनही काही फरक पडत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

सतत मळमळ

गॅस्ट्रिक कॅन्सरच्या रुग्णांमध्ये जेवल्यानंतर किंवा काही न खाल्लं तरी मळमळ होणं, उल्टी होणं हे खूप सामान्य लक्षणं आहेत. यामागचं कारण म्हणजे पोटात झालेला ट्युमर शरीराच्या पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असतो. जर ही मळमळ वारंवार होत असेल आणि इतर लक्षणांसोबत असेल तर याची गांभीर्याने दखल घ्यावी.

Early stomach cancer symptoms
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

भूक मंदावणं

पोटाचा कॅन्सर असलेल्या व्यक्तींमध्ये एक प्रमुख बदल म्हणजे भूक कमी होणं. व्यक्तीला पूर्वीसारखी खाण्याची इच्छा होत नाही, अगदी अन्न पाहिलं तरी काही खावंसं वाटत नाही. ही स्थिती ट्युमरमुळे पचनक्रिया बिघडल्यामुळे होते. जर ही भूक मंदावण्याची स्थिती अनेक दिवस टिकून राहिली, तर त्यावर दुर्लक्ष करू नका.

Early stomach cancer symptoms
Stomach Cancer Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर तुम्हाला देतं हे संकेत, वेळीच लक्षणं ओळखा

शौचादरम्यान रक्त

सकाळच्या वेळेत शौचाच्या वेळी रक्त येणं किंवा मल काळसर असणं हे पोटात आतून होत असलेल्या रक्तस्रावाचं संकेत असू शकतं. कधी कधी हे लक्षण पोट किंवा आतड्यांमध्ये कुठेतरी रक्तस्त्राव चालू असल्याचं लक्षण असतं. असं लक्षण दिसल्यास डॉक्टरांकडे धाव घ्या.

वजन कमी होणं

एक महत्त्वाचं आणि गंभीर लक्षण म्हणजे वजन अचानक कमी होणं. जर तुमचं वजन डाएट किंवा व्यायाम न करता कमी होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. पोटाच्या कॅन्सरमुळे नुसती भूक कमी होतेच, पण शरीरातला मेटॅबॉलिझमही बिघडतं. कॅन्सर पेशी शरीरातील ऊर्जा जास्त प्रमाणात वापरतात, त्यामुळे व्यक्तीचं वजन वेगाने कमी होऊ लागतं.

Early stomach cancer symptoms
Obesity: धक्कादायक! देशभरातील ४५% किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या; पाहा कोणत्या कारणांमुळे वाढतोय पोटाचा घेर

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com