Symptoms of throat cancer: घसा सुजलाय आणि गिळताना त्रास होतोय? घशाच्या कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Throat cancer symptoms: घसा सुजणं, गिळताना त्रास होणं किंवा सतत घशात वेदना जाणवणं ही लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणं घशाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
Symptoms of throat cancer
Symptoms of throat cancerSAAM TV
Published On

हवामानात किंवा आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम अनेकदा आपल्या आरोग्यावर पाहायला मिळतो. अशावेळी घशाच्या समस्या देखील बळवतात. घशाच्या दुखण्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र घसा दुखणं जर अनेक आठवडे राहित तर ते गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

कॅन्सर तज्ज्ञांच्या मते, आवाज बसणं, गिळताना त्रास होणं किंवा सतत घशात वेदना जाणवणं ही घसा किंवा लॅरिंक्स (आवाजाचा भाग) यांच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. एका वेबसाईटला माहिती देताना मॅथ हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉ. अक्षत मलिक यांनी सांगितलं की, अनेक रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि उशिरा डॉक्टरांकडे येतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, लॅरिंजियल कॅन्सर हा स्वरयंत्राला प्रभावित करतो तर घशाचा कॅन्सर फॅरिंक्स किंवा आसपासच्या भागांमध्ये होऊ शकतो. दोन आठवड्यांनंतरही आवाजातील बदल सुधारत नसेल तर ते मोठा संकेत मानलं पाहिजे.

Symptoms of throat cancer
Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

याशिवाय मानेत गाठ जाणवणं, गिळताना वेदना होणं, कोणतेही कारण नसताना वजन कमी होणं, दीर्घकाळ कान दुखणं किंवा सतत खोकला येणं या लक्षणांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनद्वारे उपचार करता येतात. पण कॅन्सर पुढच्या स्टेजपर्यंत पोहोचला तर मोठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

सुरुवातीच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नका

आवाजातील बदल

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज बसलेला राहणे हे सर्वात सुरुवातीचे आणि सामान्य लक्षण आहे.

गिळताना वेदना

गिळताना अस्वस्थ जाणवणं किंवा वेदना होणं आणि त्यासोबत वजनात घट होत असेल तर तपासणी करून घ्या.

Symptoms of throat cancer
Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

मानेत गाठ जाणवणं

मानेत सूज किंवा गाठ दिसल्यास ती लिम्फ नोड्सशी संबंधित असू शकते. त्यामुळे लगेच तपासणी आवश्यक आहे.

सतत खोकला किंवा कानदुखी

दीर्घकाळ खोकला किंवा एका बाजूला कारण नसताना कान दुखणं हे घशाशी संबंधित त्रासाचं लक्षण मानलं जातं.

Symptoms of throat cancer
Kidney failure warning signs: शरीरात हे मोठे बदल दिसले तर समजा किडनी फेल होणारे; डॉक्टरांनी स्पष्ट केली लक्षणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com