Kidney function and urine
Kidney function and urinesaam tv

Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

Kidney function and urine: आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव म्हणजे किडनी (मूत्रपिंड). किडनीचे मुख्य काम रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करून शरीराबाहेर टाकणे आहे. पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करणे थांबवते, तेव्हा काही लक्षणे दिसू लागतात.
Published on
Summary
  • किडनी आजाराची लक्षणे सुरुवातीला हलकी असतात.

  • पाय सुजणं आणि थकवा हे गंभीर संकेत आहेत.

  • भारतात दोन लाखांहून अधिक मृत्यू किडनी आजारामुळे होतात.

जर तुम्हाला दिवसभर खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर ते शरीरातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. परंतु यासोबत पाय सुजणं, लघवीचा रंग बदलणं अशी लक्षणं दिसू लागली, तर ते गंभीर मानणे आवश्यक आहे. हे किडनी फेल होण्याचे किंवा किडनीसंबंधी इतर आजाराचे संकेत असू शकतात.

भारतातील परिस्थिती

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) च्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू किडनीच्या आजारांमुळे होतो. त्यामुळे किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणारे ठरू शकते.

Kidney function and urine
High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

किडनीचे दोन प्रमुख आजार

नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सक्सेना यांच्या मते, किडनीचे आजार दोन प्रकारचे असतात यामध्ये अक्यूट किडनी डिसीज आणि क्रॉनिक किडनी डिसीज यांचा समावेश आहे.

अक्यूट किडनी डिसीज

ही अचानक होणारी समस्या आहे. शारीरिक दुखापत किंवा संसर्गामुळे ती उद्भवू शकते. काही तासांत किंवा काही दिवसांत ती वाढते पण योग्य उपचारांमुळे ती बरी होऊ शकते.

क्रॉनिक किडनी डिसीज

हा दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. यामध्ये हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होत जाते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असतो.

Kidney function and urine
Hidden Heart Attack: कसा ओळखाल सायलेंट हार्ट अटॅक? जीवावर बेतण्यापूर्वी जाणून घ्या

लघवीतील बदल हे महत्वाचे संकेत

किडनी फेल होण्याची सुरुवातीची लक्षणं हलकी असतात. त्यामुळे अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु लघवीच्या पद्धतीत बदल होणं, लघवीचा रंग बदलणं किंवा लघवीतून रक्त येणं ही किडनी आजाराची महत्त्वाची चिन्हं आहेत.

Kidney function and urine
Rising Blood Sugar Level : तुमच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी का वाढते? त्याची लक्षणे कोणती ?

किडनी फेल होण्याची मुख्य लक्षणं

किडनी फेल झाल्यास शरीरात प्रचंड थकवा आणि कमजोरी जाणवते. पायांमध्ये सूज येते त्याचप्रमाणे लघवीत काही विशिष्ट बदल दिसून येतात. अशी लक्षणंआढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Kidney function and urine
Using sugar in cooking: कोणत्या भाज्यांमध्ये किंचित साखर घातल्यास चव वाढते?

किडनी आरोग्य राखण्यासाठी उपाय

किडनी निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, कमी मीठ आणि कमी साखरेचा वापर, त्याचप्रमाणे पुरेसे पाणी पिणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय नियमित रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

Kidney function and urine
What do you know about Mumbai? : शहर एक नावं अनेक! नवी मुंबई ते ग्रेटर मुंबई आणि सब अर्बन मुंबई यांमध्ये फरक काय?

किडनीसाठी घातक सवयी

काही चुकीच्या सवयी किडनीवर वाईट परिणाम करतात. धूम्रपान ही त्यापैकी सर्वात धोकादायक सवय आहे. धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसांचे नव्हे तर किडनीचे कार्यही बिघडतं. जास्त मद्यपान टाळावं कारण त्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे जास्त मीठ आणि साखर यांचं सेवन टाळणंही किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Kidney function and urine
Blood sugar spike: रक्तातील साखर झपाट्याने वाढली तर काय कराल? घरच्या घरी या सोप्या पद्धतींचा करा वापर
Q

किडनी फेल होण्याचे प्रमुख लक्षण कोणते?

A

थकवा, पायांची सूज आणि लघवीत बदल हे प्रमुख लक्षण आहेत.

Q

भारतात दरवर्षी किडनी आजारामुळे किती मृत्यू होतात?

A

दरवर्षी दोन लाखांहून अधिक मृत्यू होतात.

Q

किडनीचे दोन प्रमुख आजार कोणते?

A

अक्यूट किडनी डिसीज आणि क्रॉनिक किडनी डिसीज.

Q

किडनीसाठी सर्वात घातक सवय कोणती?

A

धूम्रपान ही किडनीसाठी सर्वात घातक सवय आहे.

Q

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

A

पुरेसे पाणी, संतुलित आहार आणि नियमित तपासणी महत्त्वाची आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com