मुंबई म्हणजे अनेकांच्या स्वप्नांची मायानगरी. प्रत्येक तरुण आपल्या उराशी एक मोठं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये पाऊल ठेवतो. मुंबईत प्रतेकाच्या हाताला काम मिळतं असं म्हटलं जातं. आता मुंबईमधील पसारा फार वाढला आहे. त्यामुळे मुंबई नेमकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते? तसेच मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई आणि मुंबई सब अर्बनचा रूट कसा आहे? याबद्दल अद्यापही अनेकांना माहिती नाही. त्यामुळेच आज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, मुंबई मेट्रो पॉलिशन आणि रिजन, तिसरी मुंबई यामध्ये नेमका फरक तरी काय?
महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये 2 जिल्हे येतात त्यातील
1. मुंबई शहर
2. मुंबई सब अर्बन
मुंबई शहरमध्ये - कुलाबा, माहीम आणि सायनपर्यंतचा परिसर येतो.
मुंबई सब अर्बनमध्ये - वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते सायन आणि कुर्ला ते मुलुंडपर्यंतचा परिसर आहे.
ग्रेटर मुंबई (आमची मुंबई) कोणत्या शहरांना म्हणतात?
ग्रेटर मुंबईमध्ये मुंबई आणि मुंबई सब अर्बनमधील सर्व शहरे येतात. यात कुलाबा, माहीम आणि सायनपर्यंतचा परिसर तसेच वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते सायन आणि कुर्ला ते मुलुंडपर्यंतचा संपूर्ण परिसर येतो.
ठाणे आणि रायगड दोन्ही जिल्हे जोडल्यास यामधील काही शहरे मुंबई मेट्रो पॉलिशनमध्ये येतात. याअंतर्गत 9 बृहमुंबई महानगरपालिका येतात.
वसई विरार
मीरा भाईंदर
दहिसर पूर्व
ठाणे
नवी मुंबई
पनवेल
कल्याण डोंबिवली
उल्हासनगर
भिवंडी
निजामपूर
वरील सर्व बृहमुंबई महानगरपालिका मुंबई मेट्रो पॉलिशनमध्ये येतात.
मुंबई शहरात मध्य रेल, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाईन आहेत. यातील सर्व स्थानकांची यादी जाणून घेऊयात.
मरीन लाइन्स, चरनी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परेल, एल्फिंस्टन रोड , दादर, माटुंगा रोड, माहिम, बांद्रा, खार रोड, सांताक्रूज, विले पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगांव, मलाड, कांदिवली, बोरीवली, दहीसर, मीरा रोड, भयंदर ही वेस्टर्न लाईनमधील रेल्वे स्थानके आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज, मस्जिद बन्दर, सैंडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परेल, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, नाहुर, मुलुंड, सायन, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ते कर्जत आणि कल्याण ते कसारा.
छत्रपति शिवाजी महाराज, मस्जिद बन्दर, सैंडहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, रे रोड, कॉटन ग्रीन, शिवडी, वडाला रोड, गुरु तेग बहादुर नगर, चुनाभट्टी, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.