Navi Mumbai Job: नवी मुंबई महापालिकेत तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; १९५ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

Navi Mumbai Municipal Corporation Job: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
Navi Mumbai Job
Navi Mumbai JobSaam Tv
Published On

नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १९४ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीत शिकाऊ उमेदवार अर्ज करु शकतात.

नवी मुंबई महानगरपालिकेत सुरु असलेल्या अप्रेंटिसशिप भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना रोजगार महास्वयं या वेब पोर्टलवर नाव नोंदवावे लागेल. त्यानंतर उमेदवार अर्ज करु शकतात.http://rojgar.mahaswayam.gov.in/#home/index या वेब पोर्टलवर तुम्हाला नाव नोंदणी करावी लागणार आहे.

नवी मुंबईत महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना २० ऑगस्ट रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. २० ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता तुम्हाला उपस्थित राहायचे आहे. यासाठी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका, ब्लॉक क्रमांक.१, सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे उपस्थित राहायचे आहे.

Navi Mumbai Job
Oil India Recruitment: परीक्षा न देता मिळवा नोकरी, Oil India मध्ये भरतीप्रक्रिया सुरू, अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या...

अप्रेंटिस पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये उमेदवारांना ६००० ते १०००० रुपये वेतन दिले जाईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शिकण्याची संधी मिळणार आहे. हे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. याबाबत सर्व माहिती https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Navi Mumbai Job
Germany Driver Jobs : महाराष्ट्रातील वाहनचालकांना जर्मनीत मिळणार नोकरी, कशी ते पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com