Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील नाव द्या; खासदार रविंद्र वायकर यांची लोकसभेत मागणी

Navi Mumbai : एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्याचा जो प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून एअरपोर्टला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे
Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportSaam tv
Published On

प्रमोद जगताप

मुंबई : मुंबई एअरपोर्टवरील विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन एअरपोर्टला दि. बा. पाटील असे नाव देण्याची मागणी होत आहे. मुंबईकर जनतेची हि मागणी पूर्ण करण्यात यावी; अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली आहे. 

Navi Mumbai Airport
Dhule Crime : रस्त्यामध्ये जबरी लूट; टोळीच्या आझादनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

भारतीय आर्युमान विधेयक २०२४ वर बोलताना खासदार वायकर (Ravindra Waikar) यांनी सदरची मागणी केली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथे नवीन एअरपोर्ट तयार करण्यात येत आहे. हे एअर पोर्ट कधीपर्यंत तयार होणार याबाबतची स्पष्टता द्यात नाही. या एअरपोर्टचे काम कधी पूर्ण होणार? जनतेच्या मागणी नुसार या एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्याचा जो प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो (Navi Mumbai Airport) मंजूर करून एअरपोर्टला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील केली आहे.

Navi Mumbai Airport
Amravati News : नकली दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड; अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त

झोपडपट्टी विकास करून अतिरिक्त रनवे करणे शक्य 
मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या फक्त दोनच रनवे आहे. जे ऐकमेकांना क्रॉस करतात. त्यामुळे विमान उड्डाण घेताना तसेच उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या विमानतळालगत झोपडपट्टी आहे. देशातील पायाभूत सुविधेसाठी केंद्र सरकारने ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद किली आहे. विविध शहरातील पायाभूत सुविधा तसेच गरीब, मध्यमवर्गीय यांच्या विकासासाठी ठेवण्यात आलेल्या या निधी पैकी १ लाख कोटी निधी देण्यात यावे. हा निधी प्राप्त झाल्यास येथील झोपडपट्टीचा शासनामार्फत पुनर्विकास करून या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करणे शक्य होईल. त्यामुळे हा निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com