Hidden Heart Attack: कसा ओळखाल सायलेंट हार्ट अटॅक? जीवावर बेतण्यापूर्वी जाणून घ्या

Silent heart attack symptoms: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. अनेकदा कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका येतो, ज्याला 'सायलेंट हार्ट अटॅक' म्हणतात.
Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Health careSaam Tv
Published On

छातीत दुखणं, डाव्या हातात वेदना जाणवणं, हृदयाचे ठोके अचानक वाढणं आणि श्वास घेण्यात त्रास होणं ही हार्ट अटॅकची ओळखीची लक्षणं आहेत. मात्र प्रत्येक वेळेस हार्ट अटॅक एवढ्या स्पष्ट चिन्हांसह येतोच असं नाही. अनेक वेळा हा झटका कोणत्याही संकेतांशिवाय येतो. यालाच ‘सायलेंट’ किंवा ‘हिडन’ हार्ट अटॅक म्हटलं जातं आणि तो नेहमीच्या हार्ट अटॅकइतकाच धोकादायक ठरतो.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये साधारणपणे छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसून येत नाहीत. कधी लक्षणं सौम्य असतात तर कधी ती ओखळू येत नाहीत. पण यामुळे उपचार उशिरा मिळतात आणि हृदयाचं नुकसान अधिक गंभीर होतं.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

एका वेबसाईटशी बोलताना मॅक्स हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागप्रमुख डॉ. बिपीन कुमार दुबे सांगतात, “जेव्हा हार्ट अटॅकची लक्षणं सौम्य, अस्पष्ट किंवा अगदीच नसल्यासारखी वाटतात, तेव्हा त्याला हिडन हार्ट अटॅक म्हणतात.”

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Kidney failure symptoms: किडनी निकामी होत असताना शरीरात होऊ लागतात 'हे' 6 मोठे बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

कशी ओळखाल हिडन हार्ट अटॅकची लक्षणं?

साध्या हार्ट अटॅकप्रमाणे उघड वेदना यात दिसत नाहीत. त्याऐवजी सौम्य थकवा, थोडं फार अस्वस्थ वाटणं, अपचनासारखी लक्षणं, छातीवर, जबड्यात किंवा पाठीवर हलका ताण जाणवणं असं काही जाणवलं तरी दुर्लक्ष केलं जातं. अशा सौम्य लक्षणांकडे लोक अ‍ॅसिडिटी, फ्लू किंवा दमल्यासारखं समजून दुर्लक्ष करतात. आणि हाच धोका असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Kidney fungal infection symptoms: तुमच्या किडनीलाही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; शरीरात होणारे 'हे' बदल वेळीच ओळखा

कोणाला जास्त धोका असतो?

हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, धुम्रपान, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा कुटुंबात हार्ट डिसीजचा इतिहास असेल तर अगदी छोट्या बदलांकडे लक्ष द्यायला हवं. स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटीस असलेले लोक यांना सायलेंट हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

सायलेंट हार्ट अटॅकचे धोके

लक्षणं सौम्य असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी हृदयाचं नुकसान वाढत जातं. उपचार न झालेल्या हार्ट अटॅकमुळे हृदय हळूहळू कमजोर होतं, भविष्यात गंभीर अटॅक किंवा हार्ट फेल्युअरची शक्यता वाढते,” असं डॉ. दुबे सांगतात.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
7 warning signs of kidney failure: शरीरात 'हे' ७ बदल दिसले तर समजा किडनी होऊ शकते; वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्या

कसा टाळाल हा धोका?

सायलेंट हार्ट अटॅक ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित हेल्थ चेकअप. विशेषत: ज्यांना हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, कोलेस्टेरॉल, धूम्रपान किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, त्यांनी नियमितपणे ईसीजी, स्ट्रेस टेस्ट किंवा इकोकार्डिओग्राम करून घ्यावा.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?
Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच ओळखून उपचार करा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com