
किडनी आजाराची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत.
लघवीमध्ये फेस येणे प्रोटिन्युरियाचे लक्षण आहे.
पाय आणि डोळ्यांभोवती सूज ही किडनी खराबीचे लक्षण आहे.
किडनी म्हणजेच मूत्रपिंड खराब होणं ही एक अशी समस्या आहे जी सुरुवातीच्या टप्प्यात फारशी लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे ही समस्या वेळेत लक्षात येत नाही आणि हळूहळू वाढत जाऊन क्रॉनिक किडनी डिसीजचं रूप धारण करते. यामुळे काही प्रकरणांमध्ये डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटचा पर्यायही निवडावा लागतो.
नॅशनल किडनी फाउंडेशनसह अनेक वैद्यकीय अहवालांनुसार, जर किडनी खराब होण्याची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात ओळखली तर यावर वेळीच उपचार करणं सहज शक्य होतं. ही लक्षणं कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया.
जर लघवीमध्ये सतत फेस दिसत असेल, तर ती प्रोटिन्युरिया नावाची अवस्था असते. यात किडनीमधले फिल्टर (ग्लोमेरुलाय) शरीरातील प्रोटीन, विशेषतः अल्ब्युमिन, लघवीतून बाहेर टाकतात जे सामान्यतः होत नाही. ही स्थिती आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ज्यावेळी किडनी शरीरातील सोडियम आणि पाणी योग्य प्रकारे फिल्टर करत नाही तेव्हा ते शरीरात साठायला लागतं आणि त्यामुळे सूज येते. ही सूज विशेषतः पाय, घोटे आणि डोळ्यांभोवती दिसते.
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने लघवीचं प्रमाण वाढतं आणि रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. या परिस्थितीला नोक्ट्युरिया म्हणतात. किडनी ज्यावेळी यूरीन योग्यरित्या concentrate करू शकत नाही तेव्हा लघवी अधिक प्रमाणात तयार होते.
किडनी एक विशेष हार्मोन तयार करतं ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी बनतात. ज्यावेळी किडनी कमजोर होते, तेव्हा त्या हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे अॅनिमिया निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणजे थकवा, अशक्तपणा आणि दमछाक.
क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये रक्तात टॉक्सिन्स जमा होतात, ज्यामुळे प्रुरिटस म्हणजेच तीव्र खाज येऊ लागते. ही खाज संपूर्ण अंगभर असते आणि कोणतीही क्रीम, तेल लावूनही कमी होत नाही.
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यावर शरीरातील द्रव्यं पचनसंस्थेवरही परिणाम करतात. त्यामुळे अन्नाचा स्वाद बिघडतो, उल्टीसारखं वाटतं आणि त्यामुळे भूक कमी होते. कधी-कधी मळमळ, उलटी आणि जेवावसं न वाटणं देखील लक्षणं असू शकतात.
किडनी खराब होण्याचे सुरुवातीचे लक्षण कोणते?
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे म्हणजे लघवीमध्ये फेस येणे, पाय-घोट्यांवर सूज, रात्री वारंवार लघवी होणे, थकवा आणि भूक मंदावणे.
लघवीमध्ये फेस का येतात?
किडनीचे फिल्टर (ग्लोमेरुलाय) कमकुवत झाल्याने प्रोटीन लघवीत गळून जातात, ज्यामुळे लघवीमध्ये फेस येतात. याला प्रोटिन्युरिया म्हणतात.
पाय आणि डोळ्यांभोवती सूज का येते?
किडनी सोडियम आणि पाणी योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे शरीरात पाणी साठते आणि पाय, घोटे आणि डोळ्यांभोवती सूज येते.
रात्री वारंवार लघवी होण्याचे कारण काय?
किडनी यूरीन कॉन्संट्रेट करू शकत नाही, त्यामुळे रात्री अधिक प्रमाणात लघवी होते. याला नोक्ट्युरिया म्हणतात.
किडनी खराब झाल्यावर थकवा का जाणवतो?
किडनी कमजोर झाल्याने इरिथ्रोपोइएटिन हार्मोनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे लाल रक्तपेशी कमी तयार होतात आणि अॅनिमिया व थकवा येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.