
जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणताही छोटा बदल झाला तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देतं. आपलं शरीर एखाद्या गंभीर आजाराकडे झुकतंय, हे आपल्याला आधीच सूचित केलं जातं. — फक्त तो संकेत ओळखता आला पाहिजे. हार्ट अटॅकसारखी गंभीर परिस्थिती देखील आपल्या शरीरात आधी काही लक्षणं निर्माण करते.
आपण बहुतेक वेळा हृदयविकाराच्या झटक्याला छातीत दुखणं किंवा दम लागणं यासोबत जोडतो, पण हे लक्षणं केवळ तिथेच मर्यादित नसतात. फार कमी लोकांना माहिती असेल की, हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावरदेखील काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं ओळखून आपण आपला जीव वाचवू शकतो.
जर कोणत्याही कारणाशिवाय चेहऱ्यावर वारंवार थंड घाम येत असेल तर हे एक गंभीर लक्षण मानलं जातं. हार्ट अटॅक येण्याआधी शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे शरीर तणावात जातं आणि यामुळे चेहऱ्यावर असा थंड घाम येतो. हा साधा घाम समजून दुर्लक्ष केलं, तर ते धोका ठरू शकतो.
हार्ट अटॅकचा त्रास फक्त छातीतच होत नाही, तो इतर भागांमध्येही पसरतो. अचानक जबड्याला, हनुवटीला, गळ्याला किंवा कानामागेही दुखू लागलं आणि ते एखाद्या काम करताना अधिक वाढलं, तर ते हार्टचं लक्षण असू शकतं.
चेहऱ्यावर अचानक सूज येणं, विशेषतः गालावर किंवा डोळ्यांच्या खालच्या भागात, ही रक्ताभिसरण योग्य न होण्याचं लक्षण आहे. ज्यावेळी हृदय शरीरभर योग्य प्रमाणात रक्त पंप करू शकत नाही तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. हे लक्षण हलकं समजू नका.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली की ओठांभोवती किंवा डोळ्यांच्या आसपासची त्वचा फिकट किंवा निळसर दिसू लागते. वैद्यकीय भाषेत याला सायनोसिस म्हणतात. हे अत्यंत गंभीर संकेत आहेत.
जर चेहरा अचानक थकलेला, ओशाळलेला दिसू लागला तर हे हृदयासंबंधीची समस्या असू शकते. ज्यावेळी शरीराला जेव्हा योग्यप्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा असं लक्षण दिसून येतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.